शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला इंधनचोरी; चार जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:18 IST

नांदगाव रोडवर माउलीनगर येथे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत इंडियन आॅइल कंपनीच्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह दोन टँकर, त्यातून काढण्यात आलेले इंधन असा एकूण ३२ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मनमाड : नांदगाव रोडवर माउलीनगर येथे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत इंडियन आॅइल कंपनीच्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह दोन टँकर, त्यातून काढण्यात आलेले इंधन असा एकूण ३२ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.इंडियन आॅइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून टँकर (क्र. एमएच १९ झेड ४७४१) पेट्रोल भरून निघाल्यानंतर तो मूळ ठिकाणी न जाता नांदगाव रोडवर सह्याद्री हॉटेलच्या मागे माउलीनगर वसाहतीमध्ये नेण्यात आला. तेथे टँकरचे कुलूप बनावट चावीने उघडून पेट्रोल काढले जात होते.मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार देवीदास ठोके, शरद देवरे, महारू माळी, किरण दासरवार आदींच्या विशेष पथकाला घटनास्थळी पाठविले. या पथकाने छापा मारून टँकरमधून पेट्रोल काढताना चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रकाश शिवाजी दराडे, विष्णू लटपटे, सतीश गायना पगारे, प्रमोद काशीनाथ देसले या चारही आरोपीं-विरुद्ध मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी