शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडकरांना आता महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:56 IST

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या तीस जून रोजी पालखेडच्या पाण्याचे रोटेशन मिळाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपाणीबाणी : वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या तीस जून रोजी पालखेडच्या पाण्याचे रोटेशन मिळाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाडकर पुरते हैराण झाले आहेत. यावर्षी मनमाडसह परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. सध्या शहरात तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असल्याने वागदर्डी धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने त्याचाही काहीसा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्रांना कमी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनामार्फत तरंग विद्युत मोटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता शहराला १२ दिवसांऐवजी चौदा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ३० जून रोजी मिळणार असल्याने त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात होण्याची शक्यता आहे.आवर्तनाची प्रतीक्षापालिकेतर्फे शिवाजीनगर, शिवाजी चौक, कॉलेज भाग, चंदनवाडी, मुरलीधरनगर, कॅम्प भाग अशा सहा ठिकाणी असलेल्या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. वीजपुरवठा खंडित तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असते. या महिन्यात मिळणारे पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास उन्हाळा पार होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण