शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

मनमाडला कासव, पक्ष्यांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 23:05 IST

नांदगाव : देशी-विदेशी कासव आणि देशी-विदेशी पोपट विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या मनमाड येथील दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यातील एक संशयित अल्पवयीने आहे. नांदगाव वनविभागाने ही कारवाई केली असून, कासव व पक्षी विक्रीकरण्यासाठी दुकानात ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्षात मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले आहे. आठ दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंतची ही कासवे आहेत. असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने कासव आणी पक्षांची तस्करी तालुक्यात होत असल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : दोन संशयितांना घेतले ताब्यात

नांदगाव : देशी-विदेशी कासव आणि देशी-विदेशी पोपट विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या मनमाड येथील दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यातील एक संशयित अल्पवयीने आहे. नांदगाव वनविभागाने ही कारवाई केली असून, कासव व पक्षी विक्रीकरण्यासाठी दुकानात ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्षात मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले आहे. आठ दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंतची ही कासवे आहेत. असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने कासव आणी पक्षांची तस्करी तालुक्यात होत असल्याचे उघड झाले आहे.नांदगाव वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक वनसंरक्षक अधिकारी डॉ. सुजित नेवासे नाशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनमाड येथे मालेगाव चौफुलीवर कासव आणी पोपट पक्षी हे विक्री होत असल्याचे कळाले. सदर घटनेची माहिती नांदगाव वनपरीक्षेत्र यांना कळविण्यात आली. त्यानंतर नांदगाव वनविभागाने घटनास्थळी जाऊन सदर दुकानात विक्रीस ठेवलेले ३ ते ६ महिन्यांचे १४ कासव व एक वर्षाचे तीन कासव असे १७ कासव ताब्यात घेतले. शिवाय सात पोपट निळे पक्षी आहेत.

त्यातील चार नांदूरमधमेश्वर भागातील व तीन पक्षी नांदेड भागातील आहेत. वनविभागाने मनमाड येथे टाकलेल्या या धाडीत कासव, पक्षी जप्त केले असून, सलीम सत्तार शेख (रा. मनमाड) याच्यासह १७ वर्षीय अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२चे ९ अन्वये १. प्रमाणे गुन्हादाखल करून सदर गुन्हा वनपरीक्षेत्र येवला यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या कारवाईत प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी तानाजी भुजबळ व वनपरीक्षेत्र अधिकारी, एम. एम. राठोड, आर. के. दोंड, ए. एम. वाघ, ए.. के. राठोड, सी. आर. मारगेपाड, पी. आर. पाटील आदींनी सहभाग नोंदवला.इन्फो३०० ते ५०० रुपयांना विक्रीयातील लहान कासव, ५०० रुपये जोडी, मोठे कासव त्याहून अधिकपटीने ग्राहकांच्या पसंतीने किंमत व विक्री केली जात होते. पोपट पक्षी ३०० ते ५०० रुपये जोडीने विक्री होत होते. तालुक्यात मोर, पोपट, पारव, कबूतर, हरीण पाळणे या प्रकरणी नांदगाव वनविभागाने हे प्राणी व पक्षी ताब्यात घेतले. पण यापूर्वी कारवाई झाली नाही, पण या घटनेमुळे परवानगी नसताना पक्षी, कासव, मोर पाळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.फोटो- ३१ नांदगाव क्राइम१३१ नांदगाव क्राइम २

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे