मनमाडला कासव, पक्ष्यांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:05 PM2021-07-31T23:05:00+5:302021-07-31T23:05:45+5:30
नांदगाव : देशी-विदेशी कासव आणि देशी-विदेशी पोपट विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या मनमाड येथील दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यातील एक संशयित अल्पवयीने आहे. नांदगाव वनविभागाने ही कारवाई केली असून, कासव व पक्षी विक्रीकरण्यासाठी दुकानात ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्षात मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले आहे. आठ दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंतची ही कासवे आहेत. असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने कासव आणी पक्षांची तस्करी तालुक्यात होत असल्याचे उघड झाले आहे.

नांदगाव वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक वनसंरक्षक अधिकारी डॉ. सुजित नेवासे नाशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनमाड येथे मालेगाव चौफुलीवर कासव आणी पोपट पक्षी हे विक्री होत असल्याचे कळाले. सदर घटनेची माहिती नांदगाव वनपरीक्षेत्र यांना कळविण्यात आली. त्यानंतर नांदगाव वनविभागाने घटनास्थळी जाऊन सदर दुकानात विक्रीस ठेवलेले ३ ते ६ महिन्यांचे १४ कासव व एक वर्षाचे तीन कासव असे १७ कासव ताब्यात घेतले. शिवाय सात पोपट निळे पक्षी आहेत.
त्यातील चार नांदूरमधमेश्वर भागातील व तीन पक्षी नांदेड भागातील आहेत. वनविभागाने मनमाड येथे टाकलेल्या या धाडीत कासव, पक्षी जप्त केले असून, सलीम सत्तार शेख (रा. मनमाड) याच्यासह १७ वर्षीय अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२चे ९ अन्वये १. प्रमाणे गुन्हादाखल करून सदर गुन्हा वनपरीक्षेत्र येवला यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या कारवाईत प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी तानाजी भुजबळ व वनपरीक्षेत्र अधिकारी, एम. एम. राठोड, आर. के. दोंड, ए. एम. वाघ, ए.. के. राठोड, सी. आर. मारगेपाड, पी. आर. पाटील आदींनी सहभाग नोंदवला.
इन्फो
३०० ते ५०० रुपयांना विक्री
यातील लहान कासव, ५०० रुपये जोडी, मोठे कासव त्याहून अधिकपटीने ग्राहकांच्या पसंतीने किंमत व विक्री केली जात होते. पोपट पक्षी ३०० ते ५०० रुपये जोडीने विक्री होत होते. तालुक्यात मोर, पोपट, पारव, कबूतर, हरीण पाळणे या प्रकरणी नांदगाव वनविभागाने हे प्राणी व पक्षी ताब्यात घेतले. पण यापूर्वी कारवाई झाली नाही, पण या घटनेमुळे परवानगी नसताना पक्षी, कासव, मोर पाळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
फोटो- ३१ नांदगाव क्राइम१
३१ नांदगाव क्राइम २