मनमाड : शेतकरी व व्यापारी यांच्या वादामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले असून, व्यापारीवर्गाने गोणीचा आग्रह सोडून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करावे तसेच शेतमाल नियमन मुक्तीबाबत पुनर्विचार करावा या मागणीसाठी शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मनमाड - चांदवड महामार्गावर रास्ता राको आंदोलन केले.येथील महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी ठिया मारल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.या वेळी शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ देशमुख, तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, शहरप्रमुख मयूर बोरसे, अशोक पवार, दशरथ लहिरे, राजू सांगळे, अंकुश कातकाडे, हिरामण व्हर्गळ, पोपट गरुड, बाळू माळवतकर, दिलीप भाबड, बाळासाहेब रसाळ, गणेश सांगळे, पुंडलीक कातकाडे, निवृत्ती पगार, संजय सानप, प्रमाश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
मनमाडला कांदाप्नश्नी रास्ता रोको
By admin | Updated: August 2, 2016 00:47 IST