मनमाडला दुसरे कोविड सेंटर सुरु करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 10:09 PM2021-04-07T22:09:37+5:302021-04-08T01:02:33+5:30

मनमाड : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बुधवारी (दि. ७) शहरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दुसरे डीसीएचसी सेंटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Manmad should start another Kovid Center | मनमाडला दुसरे कोविड सेंटर सुरु करावे

हिसवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थितीचा आढावा घेताना लीना बनसोड. समवेत डॉ. जगताप, डॉ. दवंगे आदी.

Next
ठळक मुद्देलीना बनसोड : पाहणीनंतर अधिकाऱ्यांशी चर्चा

मनमाड : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बुधवारी (दि. ७) शहरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दुसरे डीसीएचसी सेंटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

शहरात काम सुरू असलेल्या डीसीएचसी सेंटरची त्यांनी पाहणी केली. शहरात ऑक्सिजन बेडची संख्या कशी वाढवता येईल याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मनमाड रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्टेशनजवळ नवीन लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या लसीकरण केंद्राचा रेल्वे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचा परिवाराला लाभ घेता येणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. नरवणे, रेल्वे रुग्णालयाचे डॉ. क्षत्रिय, नगरसेवक गणेश धात्रक, एससी, एसटी रेल्वे असोसिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे, सिद्धार्थ जोगदंड आदी उपस्थित होते.

हिसवळ प्राथमिक आरोग्य केंद्रास बनसोड यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Manmad should start another Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.