कळवण : सत्यं शिवंम सुंदरम हे ब्रिदवाक्य घेउन काम करणाºया दुरदर्शन ने डिजीटलायजेशनच्या नावाखाली काही दुरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा घाट घातला असल्याने ग्रामिण भागातील जनतेला करमणुकीपासून वंचीत रहावे लागणार आहे. प्रसारभारतीने दिलेल्या आदेशानुसार मनमाड येथील लघुशक्ती केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने परिसरातील गरिबाच्या झोपडीतील ‘सह्याद्री’ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. खाजगी चॅनल च्या जमान्यात शहरातील प्रेक्षकांनी दुरदर्शन कडे पाठ फिरवली असली तरी ग्रामिण भागातील डोगंर दºयात राहाणाºया ग्रामस्थांना करमणुकीसाठी दुरदर्शन हे एकमेव साधन होते. मुख्यत्वेकरून दुरदर्शनच्या सह्याद्री या प्रादेशीक उपग्रह वाहीनीचा ग्रामिण भागात मोठा प्रेक्षक वर्ग आहे. राज्यातील सर्वात जुनी वाहीणी असून यांचे २४ तास प्रक्षेपण सुरू असते.मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहीणीस बराच मोठा प्रेक्षक वर्ग आहे.दुरदर्शन वरील अन्य मालिकां बरोबरच खास शेतकºयांसाठी तयार करण्यात आलेल्या आपली माती आपली मानस या कार्यक्रमाला ग्रामिण भागातील जनतेकडून विशेष पसंती दिली जात. मनमाड येथे गेल्या चोवीस वर्षां पुर्वी नेहरू उद्यानाजवळ दुरदर्शन प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले.त्या आधी परिसरात केंद्र नसल्याने म्हैसमाळ येथील केंद्राची रेंज मिळवण्यासाठी तब्बल पन्नास फुट उंच असा अॅन्टेना लावावा लागत असे. ही बाब खार्चीक असल्याने शहर व परिसरात अगदी बोटावर मोजण्या इतक्या धनदांडग्या लोकांकडे दुरदर्शन संच पहावयास मिळत .मनमाड येथील लघुकेंद्र सुरू झाल्यानंतर खºया अर्थाने दुरदर्शन घराघरात जाउन पोहचले.अगदी अल्प कालावधी मधे दुरदर्शनला मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला. प्रसार भारती अर्थात दूरदर्शन अनुरक्षण केंद्र, औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील३५ दुरदर्शन प्रक्षेपण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मनमाड येथील दुरदरर्शन लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. प्रसार भारती बोर्डाच्या निर्णयानुसार दुरदर्शन लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र मालेगाव येथील दुरदर्शनचे चॅनेल न ११ फ्रिक्वेन्सी २१७.२५ एमएचझेड डी डी नॅशनल -डीडी सह्याद्री व चॅनेल नं २२ फ्रिक्वेनसी ४७९.२५ आणि डी डी न्युज तसेच दुरदर्शन लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र मनमाड येथील दुरर्दर्शनचे चॅनेल न ३० -फ्रिक्वेनसि ५१९.२५ डी डी नॅशनल आणि डीडी सह्याद्री चे प्रक्षेपण बंद करण्याची सुचना जारी करण्यात आली आहे. दुरदर्शनचे राष्ट्रीय,क्षेत्रीय तसेच इतर कार्यक्रमांचे डिजिटल प्रसारण दुरदर्शनची डिटीएच सेवा म्हणजेच डीडी फ्री डिशवर उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी लागणारे सेट टॉप बॉक्स,डिश, अँटेना आदी साहीत्य ग्राहकांना बाजारातून विकत घ्यावे लागणार आहे.या निर्णयामुळे ग्रमिण भागातील गारेगरीब जनता करमणुकीपासून वंचीत राहाणार आहे.
मनमाड : दुरदर्शनचे लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय झोपडीतून ‘सह्याद्री’ हद्दपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:42 IST
कळवण : दुरदर्शन ने डिजीटलायजेशनच्या नावाखाली काही दुरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा घाट घातला आहे.
मनमाड : दुरदर्शनचे लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय झोपडीतून ‘सह्याद्री’ हद्दपार!
ठळक मुद्देशहरातील प्रेक्षकांनी दुरदर्शन कडे पाठ फिरवली उपग्रह वाहीनीचा मोठा प्रेक्षक वर्ग