मनमाड : गोहाटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पधेर्साठी महाराष्ट्र राज्य संघात छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील निवड झालेल्या ३३ खेळाडूंपैकी १३ खेळाडू हे मनमाड शहरातील आहे.मुकुंद संतोष आहेर,निकिता वाल्मिक काळे,प्राजक्ता रवींद्र खालकर, नूतन बाबासाहेब दराडे,करुणा रमेश गाढे,साक्षी संजय पांडे,धनश्री नितीन पवार,संध्या भास्कर सरोदे,धनश्री विनोद बेदाडे,दिया किशोर व्यवहारे, अमृता भाऊसाहेब शिंदे,सिद्धी सुनील नागरे,अथर्व किरण माने,जयराज राजेश परदेशी या खेळाडूंची राज्य संघात निवड झाली असून त्यांनाक्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे जय भवानी व्यायामशाळेचे जयराम सानप छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर मुख्याध्यापिका सौ के एस लांबोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
मनमाडच्या खेळाडूंची राज्य संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 18:54 IST