शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:20 IST

येथे विवेकानंदनगरमध्ये राहणारे मुख्याध्यापक मुकुंददास मनोहरदास शोभावंत यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ते मेसनखेडे ता. चांदवड येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पहात असत. आॅनलाइन कामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली असल्याचे सांगण्यात आले.

मनमाड : येथे विवेकानंदनगरमध्ये राहणारे मुख्याध्यापक मुकुंददास मनोहरदास शोभावंत यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ते मेसनखेडे ता. चांदवड येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पहात असत. आॅनलाइन कामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली असल्याचे सांगण्यात आले.  शोभावंत यांची पत्नी व मुली बाहेरगावी लग्नाला गेले होते. बुधवारी त्यांची मुलगी घरी आली असता घराच्या छताला शोभावंत यांनी फाशी घेतल्याचे तिला आढळून आले. मुकुंददास मनोहरदास शोभावंत (५४) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती राजेंद्र अनिलकुमार बैरागी यांनी पोलिसांना दूरध्वनीद्वारे दिली. शोभावंत हे त्यांचे मेहुणे होत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.एस. निंबाळकर हे करीत आहेत.सत्यता पडताळणारपोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता शोभावंत यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. आॅनलाइन कामाला व शाळेच्या बांधकामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याचे समजते. या चिठ्ठीची सत्यता पोलीस पडताळून पहात आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू