लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : पाणीटंचाई भेडसावणाऱ्या मनमाड शहरात प्रशासनाने शॉपिंग सेंटर उभारण्यापेक्षा पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस अध्यक्ष अफजल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एकात्मता चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.पालिकेमार्फत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत सुमारे चार कोटी रुपयांचे सुरू असलेले आयुडीपीमधील शॉपिंग सेंटरचे बांधकाम तातडीने थंबवावे व त्यातील दोन कोटी रुपयांचा निधी करंजवन पाणीपुरवठा योजनेसाठी वर्ग करावा या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहर अध्यक्ष अफजलभाई शेख, नगरसेवक संतोष अहिरे, रवींद्र घोडेस्वार,नाझीम शेख, संजय निकम, रहेमान शाह, भीमराव जेजुरे आदी उपस्थित होते.आंदोलनात शशिकांत व्यवहारे, बाळासाहेब साळुंके, सुनील गवांदे, इलियास पठाण, बद्रुद्दीन सईदशेख, अकबर बेकरीवाले, अनिल गुंदेचा, फकिरराव शिवदे, परवेज आजमी, डी. जी. मकासरे, बी.टी. पदमने, महिला कॉँग्रेसच्या मुमताज बेग, फतमा शहा आदी उपस्थित होते.करंजवन योजना मार्गी लावण्याची मागणीसध्या जे शॉपिंग सेंटरचे बांधकाम सुरू आहे त्याच्याशेजारी पालिकेचे अनेक गाळे काही वर्षांपासून पडून आहेत तेथे कोणत्याही शॉपिंग सेंटरची गरज नाही. उलट शहरात भरपावसाळ्यातही १५ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे त्यासाठी करंजवन योजना मार्गी लागणे गरजेचे आहे. लोकवर्गणीसाठी पालिकेने या नगरपालिका निधीतून व चौदाव्या वित्त आयोगाच्या मजूर रकमेतून दोन कोटी रुपये भरावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
मनमाड शहर काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:22 IST
मनमाड : पाणीटंचाई भेडसावणाऱ्या मनमाड शहरात प्रशासनाने शॉपिंग सेंटर उभारण्यापेक्षा पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस अध्यक्ष अफजल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एकात्मता चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.
मनमाड शहर काँग्रेसचे धरणे
ठळक मुद्देमुझफ्फर हुसेन । शॉपिंग सेंटरपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या