शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Video : राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित हॉटेलवर तुकाराम मुंंढेंचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:01 IST

अतिक्रमण विरोधी मोहीम : नदीपात्रात भराव टाकून बनविले होते हॉटेल किनारा

ठळक मुद्दे मुंबई नाक्यावरील नासर्डी नदीपात्रात भराव टाकून अनधिकृतपणे उभारलेल्या हॉटेल किनाराचे बांधकाम उद्धवस्त करण्याची कारवाई

नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील नासर्डी नदीपात्रात भराव टाकून अनधिकृतपणे उभारलेल्या हॉटेल किनाराचे बांधकाम उद्धवस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदर हॉटेलमध्ये एका नगरसेवकासह  राष्ट्रवादीच्या नेत्याचीही भागीदारी असल्याचे सांगितले जाते. शहरात महापालिकेमार्फत गेल्या महिनाभरापासून अतिक्रमण विरोधी मोहीम जोरदारपणे सुरू आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच इमारतीच्या सामासिक अंतरातही उभारलेली अनधिकृत बांधकामे काढण्याची मोहीम सुरू आहे. बुधवारी (दि.४) सकाळी १० वाजेच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील हॉटेल किनारावर धडक मारली. सदर हॉटेल हे नासर्डी नदीपात्रात भराव टाकून उभे करण्यात आल्याची तक्रार आहे याशिवाय, सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचेही महापालिकेचे म्हणणे आहे.

सदर हॉटेल हे एका नगरसेवकासह  राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सदर अतिक्रमणाला अभय मिळत होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आणि गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनाघडामोडी पाहता आयुक्तांनी सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, अतिक्रमण विभागाला आज पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर नासर्डी नदीपात्रात भराव टाकून उभारलेले हॉटेल किनारा हटविण्यास सुरुवात झाली. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम सुरू असून तीन जेसीबीद्वारे बांधकाम पाडले जात आहे. तत्पूर्वी, अनधिकृत बांधकाम हटविण्याची कुणकुण लागल्याने जागामालकाने पथकाशी वादही घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाने आपल्या कारवाईला सुरुवात केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमणtukaram mundheतुकाराम मुंढे