शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:28 IST

गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.

ठळक मुद्देहवामानात सातत्याने बदल : मोहर गळतीने उत्पादन घटण्याचा अंदाज

वटार : गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गावरान जातीची मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. त्यात गोट्या, सेंद्र्या, काळ्या, ढवळ्या, दोडी आदी अशी आंब्याची नावे आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या नवीन केसरसारखी आंब्याच्या जाती लावल्या आहेत. थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे.आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे. परिसरात आंबा मोहराच्या सुगंधाने भरून गेला आहे. प्रचंड मोहर आल्याने उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे; मात्र त्यासाठी निसर्गाची साथ अपेक्षित असून, येत्या पंधरवड्यात थंडीने चंबूगबाळे आवरले तरच मोहराचे चांगले फळ चाखण्यास मिळेल.गेली चार वर्षं लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड मनसोक्तपणे गोड करण्याची चिन्हे आहेत. दिवसभर वारगी चालू असल्यामुळे मोहोर झटकला जात आहे. आंब्याला फुलोºयावर आलेला मोहर कुजून गेला असून, असा मोहर काळा पडत असल्याने आंब्याचा भार गळून पडला आहे, त्यामुळे आंबा उत्पादन घटण्याचा अंदाज शेतकºयांकडून व्यक्त केला जात आहे.वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाववातावरणात अचानक बदल झाला असून, दिवसभर थंडगार वारे निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार उद्भवू लागले आहेत, त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्येरुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.४गेल्या चार-पाच वर्षांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत असल्याने साहजिकच याचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. कारण या ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी