विंचूर : विष्णुनगर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी झालेल्या निवडणुकीत मंगला घायाळ या विजयी झाल्या आहेत. घायाळ या पहिल्या महिला सरपंच म्हणून निवडून आल्याने गावात जल्लोष झाला.सरपंचपद सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित असल्याने सरपंचपदासाठी चौरंगी लढत होवुन मंगला घायाळ या २०५ मते घेऊन विजयी झाल्या. तर सुलभा मवाळ (१८५), सुषमा देसले(१०६),सोनाली भडांगे(१०६) यांचा पराभव झाला. ३ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. उर्वरित २ सदस्यांच्या जागेसाठी वार्ड क्र .२ मधून सरला मुरकुटे (१२६) या विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मिराबाई नवले (९४) या पराभूत झाल्या. तसेच वार्ड क्र मांक ३ मधून गयाबाई देसले ८९ मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड क्र मांक १ मधून हेमंत घायाळ व सुदाम घायाळ यांनी माघार घेतल्याने नामदेव बंडु घायाळ व रंजना नाना घायाळ ह्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. वार्ड क्र मांक २ मधुन ज्ञानेश्वर देसले व किशोर मवाळ यांनी माघार घेतल्याने मच्छिंद्र गावडे यांची बिनविरोध निवड झाली. तर वार्ड क्र मांक ३ मधून अक्षदा घायाळ तसेच विलास जेऊघाले यांच्या विरोधात अर्ज न आल्याने या दोन सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली होती.
विष्णूनगर ग्रामपालिका सरपंचपदी मंगला घायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:21 IST
समर्थकांचा जल्लोष : पहिल्या महिला सरपंचपदी निवड
विष्णूनगर ग्रामपालिका सरपंचपदी मंगला घायाळ
ठळक मुद्देसरपंचपद सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित असल्याने सरपंचपदासाठी चौरंगी लढत होवुन मंगला घायाळ या २०५ मते घेऊन विजयी झाल्या.