शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४६ ग्रॅम सोने, दुचाकी हस्तगत 

By अझहर शेख | Updated: January 9, 2024 18:47 IST

३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.

नाशिक : धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या कर्नाटकच्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकल्याची घटना द्वारका येथे गुरुवारी (दि. ४) भर दुपारी घडली होती. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाला गती देत दोघा संशयित सोनसाखळी चोरांना अवघ्या पाच दिवसांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे ११ ग्रॅम सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.

कर्नाटक राज्यातील रहिवासी फिर्यादी सुरेश शिवा नाईक (४९) यांच्या आई नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आल्या होत्या. गुरुवारी (दि. ४) दुपारी १२.३० वाजता द्वारका सर्कल परिसरात आलेल्या असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी नाईक यांच्या आईच्या गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपयांची पोत व मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ४) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सतीश साळुंके, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, नीलेश विखे आदींच्या पथकाने याबाबत तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. दोघे संशयित हे आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील नीलगिरी बाग परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पथकाला मिळाली. तेव्हापासून पथकाने या भागात दिवसरात्र सापळे रचून संशयितांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. रविवारी (दि. ७) पथकाच्या प्रयत्नांना यश आले. दोन्ही संशयित ओंकार ऊर्फ दीपक वसंत शिंदे (२३, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम), रोशन सुधाकर कटारे (२३, रा. अमृतधाम) यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडे या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याबाबत कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मागील तीन महिन्यांपूर्वी तपोवन रस्त्यावर झालेल्या सोनसाखळी चोरीचाही गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पवार हे करीत आहेत. दोन गुन्हे उघड; जप्त मुद्देमाल असा...

२ लाख रुपये किमतीची ३५.८० ग्रॅमची सोन्याची लगड५८ हजार रुपये किमतीची १०.८० ग्रॅमची सोन्याची लगड

६० हजार रुपये किमतीची पल्सर-२२० दुचाकी. असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल भद्रकाली पोलिसांनी जप्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक