शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

मंगलम, तिल्लानाच्या सादरीकरणाने जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:01 IST

अप्रतिम पदन्यास आणि लयबद्ध हस्तमुद्रांसह केलेल्या नृत्यांगना रश्मी रुईकर यांनी केलेल्या ‘अरंगेत्रम’च्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कालिदास कलामंदिरात रश्मीने मंगलम आणि तिल्लानासह विविध प्रकार अत्यंत सफाईदारपणे सादर करीत रंगमंच प्रवेश केला.

नाशिक : अप्रतिम पदन्यास आणि लयबद्ध हस्तमुद्रांसह केलेल्या नृत्यांगना रश्मी रुईकर यांनी केलेल्या ‘अरंगेत्रम’च्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कालिदास कलामंदिरात रश्मीने मंगलम आणि तिल्लानासह विविध प्रकार अत्यंत सफाईदारपणे सादर करीत रंगमंच प्रवेश केला.नृत्यसाधना कला अकादमीच्या वतीने आयोजित या कार्यक्र मात हिदोलाम रागावर आधारित तिल्लाना व सौराष्ट्रम रागावर आधारित मंगलम या प्रकाराचे सादरीकरण केले. त्याशिवाय मल्हारी, अलरिपू, श्री शंभो जातिस्वरम, पदम, वर्णम, अभंग यांचाही नृत्याविष्कार झाला. नृत्यात ताल, सुरावरील अप्रतिम पदलालित्यावर जाणकार रसिकांनी मनमुराद दाद दिली. अरंगेत्रम हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेशस्तवन आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमासाठी के. दक्षिणामूर्ती पिलाई (मृदंगम), डॉ. सोमिया (गायन), नारायण पार्थसारथी (व्हायोलीन), नंदकुमार (बासरी), विकास बेलूकर (पखवाज) यांनी दमदार साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता पेठकर यांनी केले.भरतनाट्यमचा वारसासात वर्षांच्या प्रशिक्षणानंतर एकटीने संपूर्ण कार्यक्र म करण्याच्या प्रक्रियेला अरंगेत्रम असे नाव आहे. भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्रीने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे. अरंगेत्रमनंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्र मांतून नृत्य करण्यास परवानगी देतात. त्यानुसार या कार्यक्रमातदेखील गुरु संगीता पेठकर यांच्या अनुमतीनंतरच रश्मीने गुरुवंदना करून तिचे सादरीकरण केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक