शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'...तर मग मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल'; मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकमध्ये इशारा

By संजय पाठक | Updated: February 8, 2024 13:00 IST

मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे नाशिक शहरात मुंबई नाका येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

नाशिक - तुमची लेकरं बाळ आहेत,  तशी आमची पण आहे तुम्ही जगाने आम्हाला जगू द्या मात्र आमच्या आरक्षणाला आडवे याला तर मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज नाशिकमध्ये दिला. मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे नाशिक शहरात मुंबई नाका येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तीन वेळा आलेले आहेत. आता त्यांनी ते सोडून द्यावे, ओबीसी समाजाने छगन भुजबळ यांना समजावावे अन्यथा आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल असे जरांगे पाटील म्हणाले. येत्या 10 फेब्रुवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहोत याचा पुनर्विचार करताना त्यांनी सगे-सोयरे आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी यासाठी हे उपोषण असल्याचे त्यांनी सांगितलं याशिवाय मराठा समाजावरील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे अशी आपली मागणी होती त्याचीही पूर्तता झालेली नाही त्यामुळेही हे उपोषण नमूद असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNashikनाशिक