त्र्यंबकेश्वर : गुरूप्रेमाच्या रंगात रंगल्यानेच मानवाचे कल्याण होऊ शकते. खरा सत्संग मिळणे कठीण आहे. कारण आज सर्वत्र धार्मिक भेदाभेद पहायला मिळतो. संतांची शिकवण ही सर्व मनुष्यजातीला मार्गदर्शक ठरणारी असते. ती सार्वभौमिक शिक्षण देणारी असते, असे विचार संत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. जव्हाररोड येथील रुहानी मिशन शिबिरात आयोजित सत्संगात ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, संतांचा सत्संग स्वतंत्र असतो. देवाच्या पुरातन आणि खऱ्या नियमांची शिकवण यातून दिली जाते. सर्व मनुष्यजातीला, धर्माला ती लागू पडते. गुरुवाणी ही दिव्य ध्वनीची शिक्षा देत असते. हा ध्वनी आपण आपल्या अंर्तमनातून, आत्म्यातून प्रकट जाली पाहिजे. संत हे सर्व धर्माच्या स्त्री-पुरुषांना शिक्षण देण्याचे काम करतात, जे लोक सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे मन शांती आणि समाधानाने भरून जाते. मानवासाठी बाहेरच्या जगात कुठल्याही प्रकारचा आराम किंवा शांतता नाही. एखाद्याला सर्व पृथ्वीतलावरचा राजा बनवून दिले तरी सुख, शांती त्याला मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय, गुरुच्या सत्संगाशिवाय तरणोपाय नाही, असेही त्यांनी सांगितले.
गुरूप्रेमाच्या रंगातच मानवाचे कल्याण : राजेंद्रसिंह
By admin | Updated: September 13, 2015 23:08 IST