शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:18 IST

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.गोपालवाडीमार्गे जाणारा हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या रस्त्यावरून महेबूबनगर, सादिकनगर, गरीब नवाज कॉलनी या भागांतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. चार महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था वाढीस लागली असून, नागरिकांना आपली ‘वाट’ बदलावी लागत आहे. भूमिगत गटारीचे काम पूर्णत्वास येऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; मात्र रस्त्याची अवस्था अद्यापही ‘जैसे-थे’ असल्याने संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे तातडीने खडीकरण-डांबरीकरण करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे, अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. वारंवार महापालिका प्रशासनाच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील या रस्त्याची दुर्दशा थांबत नसून रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या रस्त्याची अवस्था बिघडविण्यास महापालिका प्रशासन कारणीभूत आहे, कारण रस्ता भूमिगत गटारीसाठी खोदला गेला त्यानंतर त्याची दुरवस्था अधिक वाढीस लागली. तत्पूर्वी रस्त्यावरून ये-जा करणे सहज शक्य होते. सध्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, सोमवारी सायंकाळी व रविवारी रात्री आलेल्या बेमोसमी पावसाने रस्त्याची दैनावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे; मात्र त्याचाही काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा