शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचे प्रमाण कमी, मात्र उपाययोजना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:07 IST

कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी, कुपोषण कायम असल्यामुळे या संदर्भात उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमहिला बालकल्याण समितीकडून निर्देशबाल विकास अधिकाऱ्यांना सूचना

नाशिक : कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी, कुपोषण कायम असल्यामुळे या संदर्भात उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.महिला व बालकल्याण समितीची मासिक सभा महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सर्वप्रथम कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला त्यात पेठ, हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी, येवला, चांदवड या प्रकल्पांमध्ये मे महिन्याच्या तुलनेत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात अजूनही कुपोषण दिसून येत आहे. त्यामुळे गृह ग्रामविकास प्रकल्पाद्वारे बालकांना त्यांच्याच घरी कडधान्यांपासून बनवलेल्या अमायलेज युक्त पिठांच्या विविध पाककृतीद्वारे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण मातांना देऊन आहारात वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर शासनाकडून आलेले एनर्जी फुडचे वाटप बालकांना त्यांच्या घरी देण्यात आले आहेत. त्याचेही सेवन बालके करतात किंवा नाही हे याची पाहणी अंगणवाडी सेविकांकडून गृहभेटी देऊन पाहत आहेत. या बालकांना किती आहार किती वेळा दिला जातो याची खात्री करण्याची सूचना सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या.जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी सर्व संबंधित प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व सर्व यंत्रणांनी घ्यावी. बालकांची, गरोदर, स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, बालकांचे वजन घेऊन नियमित लसीकरण करावे, असेही निर्देश देण्यात आले. कविता धाकराव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात टीटीची लस उपलब्ध नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता, त्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांनी गृहभेटी देताना कोरोना संसर्गाचा प्रसार होणार नाही याची दक्षता व काळजी घेऊनच गृहभेटी देण्यात याव्यात. गृहभेटी देताना सॅनिटायझर व मास्क याचा वापर प्रामुख्याने करण्यात येऊन सेविकांनी स्वत:ची बालकांची काळजी घ्यावी अशा सक्त सूचना सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या. सभेस समिती सदस्य कविता धाकराव, गीतांजली पवार गोळे, गणेश अहिरे, मीनाक्षी चौरे, सुनिता सानप, कमल आहेर तसेच प्रभारी महिला व बालकल्याण अधिकारी बी. के. गरजे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद