मालेगाव : शहरातील मालेगाव एज्युकेशन सोसायटी व वर्धमान शिक्षण संस्था संचलित शाळांमध्ये महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला.काकाणी कन्या विद्यालययेथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सौ. एस. पी. मोरे होते. शिक्षिका टिपरे यांनी कवी कालिदास यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगितली. तसेच त्यांच्या ‘मेघदूत’ खंडकाव्याचे महत्त्व सांगितले. पर्यवेक्षक एन. के. चौधरी यांचेही भाषण झाले. यावेळी एस. एस. चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.झुं. प. काकाणी विद्यालययेथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. पी. मोरे होते. एम. बी. केदारे, सौ. एस. डी. अस्मर, एन. ए. शेलार, यो. बा. कापडणीस, जी. ए. हिंगे, सी. पी. गवळी यांची भाषणे झाली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीत सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत सुभाषितांचे पठण करून त्याचा अर्थ सांगितला. यानिमित्ताने संस्कृत बहिस्थ परीक्षा ‘संस्कृत संवाद’च्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्ही. एफ. येवले, तुकाराम मांडवडे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. श्री. र. वी. शाह विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एल. एम. तिळवणकर होते. विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतगायन केले. सौ. एस. डी. कुलकर्णी, श्रीमती एस. आर. शिंदे यांनी संस्कृत भाषेचा महिमा, कालिदासांनी निर्माण केलेले साहित्य, त्या साहित्याची आजच्या काळानुसार असलेली गरज याविषयी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
मालेगावी महाकवी कालिदास दिन साजरा
By admin | Updated: July 5, 2014 00:26 IST