मालेगाव : शहरातील सटाणा नाका पोफळेनगर भागात संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराजांचा प्रगटदिन सोहळा सुरू असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपासून गजानन विजयग्रंथ पारायण सुरू झाले आहे. सायंकाळी महिला सत्संग भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला, तर रात्री ह.भ.प. कोमलसिंग महाराज यांचे कीर्तन झाले. पारायणास १२० महिला- पुरुष बसले आहेत. आज शुक्रवारी सकाळी उर्वरित पारायणास सुरुवात झाली. सायंकाळी महालक्ष्मी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. रात्री ह.भ.प. कांचनताई उर्किडे यांचे कीर्तन झाले. उद्या शनिवारी सकाळी ६ वाजता धार्मिक विधी, उपासना, नगर प्रदक्षिणा, महाराजांच्या पालखीची मिरवणूक आणि ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. यावेळी महाआरती व महाप्रसादाचे वाटप होईल, असे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय पोफळे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
मालेगावी गजानन महाराज प्रगटदिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:09 IST