मालेगाव मध्य : शहरातील अय्युबनगर येथे मंगळवारी (दि.१०) लागलेल्या आगीत जखमी झालेल्या यास्मीनबानो मोहंमद मोबीन यांचा रविवारी सकाळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अय्युबनगरात मंगळवारी (दि. १०) स्टोव्हचा भडका होऊन लागलेल्या आगीत हस्सान मोहंमद मोबीन शेख या चारवर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला होता, तर वडील मोहंमद मोबीन व आई यास्मीनबानो भाजले होेते. यास्मीनबानो यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या यास्मीन यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. यास्मीनबानो यांच्या पश्चात पती, मुलगी व १० महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.
आगीमध्ये जखमी झालेल्या मालेगावच्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:02 IST