शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू; आठवडाभरात दुसरा बळी, सतर्क राहण्याचे आवाहन

By suyog.joshi | Updated: April 23, 2024 18:54 IST

गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाईने फ्लूने मृत्यू झाला.

नाशिक: डेंग्यू, मलेरियाची साथ आटोक्यात येत नाही तोच स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून मालेगावच्या ६५ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाईने फ्लूने मृत्यू झाला. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे. आठवडाभरात दुसरा बळी गेल्याने मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून स्वाईन फ्लू संशयित रुगणांचा शोध घेतला जात आहे. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेणयाचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी शहरात डेंगूने थैमान घातले होते. परंतु सद्यस्थितीत स्वाईन फ्लूच्या रूपाने शहरवासीयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शहरात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने चाळीशी पार केली. त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहे. या रुग्णांच्या संपर्कातील रुगणाचे स्वब घेण्यात आले आहेत. सिन्नर आणि मालेगाव येथील दोन्हीही महिला रूग्णांचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे सिन्नर तालुक्यातील दातलीच्या महिलेपाठोपाठ मालेगावच्या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. रूग्णांना काही लक्षणे जाणवल्यास घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा. हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये. घसा खवखवत असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जावे. - डॉ तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :NashikनाशिकSwine Flueस्वाईन फ्लू