शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तहसिलदारांना लाचप्रकरणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 22:19 IST

गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे.

नाशिक, दि. २२ - गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले गौण खनिज विभागाचे लिपिक गोकुळ पाटील हे पथकाला शरण आले होते. रात्री उशीरापर्यंत येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.तालुक्यातील व-हाणे येथील मनोज पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पवार यांचा विटभट्टी व गौणखनिज विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी येथील महसुल विभागाकडे गौणखनिज वाहतुकीसाठी परवानगी मागितली होती. तसेच ११ जुलै रोजी येथील महसुल विभागाच्या पथकाने त्यांचे डंपर पकडले होते. २ ब्रास गौणखनिजापोटी २ लाख ४ हजार रुपयांचा दंड भरला होता. पवार यांना केवळ १३ हजार रुपयांची दंड भरल्याची पावती देण्यात आली होती. यानंतर डंपर चालवायचे असेल तर ५० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगण्यात आले होते. तडजोडीअंती ४० हजार रुपये हप्ता ठरला होता. याप्रकरणी पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने ११ जुलै रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर चार ते पाच वेळेस पथकाने सापळा रचला होता. मात्र तहसिलदार कोळी व लिपिक पाटील यांनी पैसे स्वीकारले नाहीत. पथकाने लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरुन शुक्रवारी तहसिलदार कोळी यांना कार्यालयातुन ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली. येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई चालू असताना लिपिक पाटील हे पथकाला शरण आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलीस हवालदार कैलास शिरसाठ, संतोष हिरे, जितेंद्र परदेशी, किरण साळी, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, कैलास जोरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकुर, प्रकाश सोनार आदिंनी ही कारवाई केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार