शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी क्रांतीदिनी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:05 IST

आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम रिजर्वेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.उर्दू ...

ठळक मुद्देआसिफ शेख : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी

आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम रिजर्वेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.उर्दू मिडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेख पुढे म्हणाले की, डॉ. मेहमुदुर्ररहमान कमिटीच्या शिफारशीनुसार २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिम समाजास पाच टक्के आरक्षण दिले होते; मात्र सत्ता परिवर्तन झाले याच दरम्यान काही लोकांनी मुस्लिम आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक पाच टक्के आरक्षण कायम ठेवीत उर्वरित सर्वच आरक्षण रद्द केले. त्याची पुर्तता न करता भाजपा शासनाने मुस्लिम आरक्षणाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले आहे. सध्या महाराष्टÑात मराठा समाजास आरक्षण द्यावे. या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याने सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत आहे. यासाठी खास अधिवेशनही बोलावण्याचे मान्य केले आहे; मात्र यास्थितीतही मुस्लिम समाज व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत एक शब्दही बोलत नाही. यावरुन सरकारची निती स्पष्ट होत आहे. भाजपा सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याने कुठलाही समाज सरकारवर विश्वास दाखविण्यास तयार नाही. याचा परिणाम म्हणूनच सर्व समाजास आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. सरकारने विशेष अधिवेशनात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा समावेश केला नाही तर मुस्लिम रिजर्वेशन फेडरेशनतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा निर्धारही शेख यांनी शेवटी व्यक्त केला. यावेळी हाफीज अनिस अझहर, नगरसेवक असलम अन्सारी, माजी नगरसेवक अ‍ॅड. हिदायतउल्लाह, इनामुल रहेमान खान, गुफरान अन्सारी, लतीफ बागवान आदि फेडरेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीम