मालेगाव : सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा ४० अंशावर गेला असून, वाढत्या उन्हाने मालेगावकर हैराण झाले आहे. रविवारी मालेगावात राज्यातील सर्वाधिक असे ४३.५ अंश सेल्सिअस असे तपमान नोंदले गेले होते. सोमवारी कमाल तपमान हे ४०.५ अंश सेल्सिअस असे तुलनेने कमी नोंदले गेले तरी उष्णतेची धग ही कालप्रमाणेच जाणवत होती. शिवाय आज वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अक्षयतृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी बारा पर्यंत नागरिकांनी काही खरेदी केली. त्यानंतर मात्र बाजारपेठेतील गर्दी काही प्रमाणात रोडावली. सायंकाळनंतर मात्र व्यवहार नित्यनियमाने सुरु झाले.
मालेगावी दुसऱ्या दिवशीही पारा ४० अंशावर
By admin | Updated: April 20, 2015 23:34 IST