गेल्या शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. लक्झरी बस क्रमांक एमएच १८ बीजी ६३५५ नामपूरकडून मालेगावकडे भरधाव वेगात नेताना मालेगावकडून नामपूरकडे जाणारी दुचाकी क्रमांक एमएच ४१ एव्ही ५३५०ला समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला, तर बस पलटी झाल्याने बसमधील सुमारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दुचाकीस्वाराच्या मरणास, बसमधील प्रवाशांच्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून बसचालकाविरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार निकम करीत आहेत.
मालेगावी लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:27 IST