शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मालेगाव ‘खैर’ जंगलतोडीचा तपास करणारे दक्षता पथक भरकटले; झाडांच्या कत्तलीपेक्षा गुन्हेगारांचीच जास्त ‘दक्षता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 16:31 IST

नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागू ...

ठळक मुद्देनाशिकच्या ‘दक्षता पथक’ अपयशी ठरले आहे. पथकाने अद्याप एकाही संशयिताला या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागू शकला नाही

नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागू शकला नाही. एकूणच वृक्षांच्या झालेल्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

http://www.lokmat.com/nashik/well-done-vigilance-squad/मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी संबंधित खैर वृक्षांच्या कत्तल करणाºया टोळीचा या जंगलात धुमाकूळ वाढला आहे. टोळीने  उसाच्या शेतामधील ऊस कापावा असा या जंगलातील खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास-शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैराची झाडे कापून गुजरातमधील गुटख्याच्या कारखान्यांना पुरविल्याची चर्चा आहे. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून मागील गुरूवारपासून (दि.११) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे, अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यास अद्याप पथकाला यश आलेले नाही. एकूणच पथकाचा तपास भरकटल्याचे बोलले जात आहे. कारण पथकाने अद्याप एकाही संशयिताला या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही.‘दक्षता’चे अपयशमालेगाव उपवनविभागाच्या हद्दीत झालेल्या खैरच्या जंगलतोडीचा शोध लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नाशिकच्या ‘दक्षता पथक’ अपयशी ठरले आहे. केवळ पंचनामा करुन कागदी घोडे नाचविण्याचे सोपस्कार या पथकाकडून पार पाडण्यात आले; मात्र अद्याप मुळ तस्कर टोळीमधील किंवा  एकालाही अटक करण्यास पथकाला यश आले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

http://www.lokmat.com/nashik/cereals-stocked-granite-forest-jungle-efficiency-squirrel-pinjle-jungle/

टॅग्स :forestजंगलArrestअटक