मारहाणीच्या निषेधार्थ मालेगाव सामान्य रु ग्णालयात आंदोलन करताना आरोग्य कर्मचारी.मालेगाव मध्य : माजी नगरसेवक रजिवान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी स्थायी समितीचे सभापती खलील शेख यांना उपचारार्थ सामान्य रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह समर्थक रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात आले होते. यावेळी आमदार समर्थकाने वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी संबंधितास अटक करण्यात यावी, कर्मचार्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा देत रु ग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर व गुढीपाडवा सण असूनही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. मात्र आमदारांसमक्ष त्यांच्या समर्थकाकडून मारहाण करण्यात आल्याने असुरिक्षततेची भावना निर्माण झाली आहे. दोषींना तत्काळ अटक करु न कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. किशोर डांगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
मालेगावी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:39 IST
माजी नगरसेवक रजिवान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी स्थायी समितीचे सभापती खलील शेख यांना उपचारार्थ सामान्य रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह समर्थक रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात आले होते. यावेळी आमदार समर्थकाने वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी संबंधितास अटक करण्यात यावी, कर्मचार्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा देत रु ग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
मालेगावी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
ठळक मुद्देगोळीबार प्रकरण : आमदार समर्थकांकडून मारहाण