शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव खटल्याचा निकाल: मालेगावी जल्लोष अन् सन्नाटाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:02 IST

या भागातील व्यवहार सुरळीत चालू असले तरीही नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मालेगाव (जि. नाशिक)  : बॉम्बस्फोटप्रकरणी गुरुवारी विशेष न्यायालयाने निकाल देत सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करताच निकालाचे शहरात पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचे स्वागत करत जल्लाेष केला, तर स्फोटातील पीडितांसह काहींनी नापसंती दर्शवत न्यायाची अपेक्षा केली. 

विशेष न्यायालयाने निकाल घोषित करताच शहरातील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोसम पूल चौकातील गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत जल्लाेष सुरू केला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरविले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला. 

फटाके फोडण्यावरून वाद 

जल्लोषप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्याचा  प्रयत्न केला. त्याला  पोलिसांनी प्रतिबंध केला. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडल्याशिवाय परत जाणार नाही, अशी भूमिका घेतली. काही वेळ कार्यकर्ते व पोलिस यांच्यात वाद होऊन फटाक्यांची खेचाखेची झाली.  

पूर्व भागात निकालाचा निषेध

न्यायालयाच्या निकालाचा शहराच्या पूर्व भागात निषेध करण्यात आला. हा निकाल आम्हाला मान्य नसून, राजकीय दडपणाखाली देण्यात आला असल्याच्या प्रतिक्रिया मुस्लीमबहुल पूर्व भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या, तर काही नागरिकांनी उघड उघड भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, या भागातील व्यवहार सुरळीत चालू असले तरीही नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.

 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटMalegaonमालेगांव