मालेगाव : शहरातील तपमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली असून, शहरातील तपमानाने चाळिशी पार केली आहे. यामुळे रहिवाशांना प्रचंड उकाड्याला तोंड देण्याची वेळ आली आहे. शहरात शुक्रवारपासून प्रचंड उष्णता जाणवत असून, तपमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. यात शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी शहरातील तपमानाची ४१ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. यात शनिवारी मालेगावचा राज्यात दुसरा क्रमांक लागला होता. यापेक्षा जास्त तपमान रायगड जिल्ह्यातील भिरा येथे ४१.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. सोलापूर, परभणी, नांदेड आणि वर्धा येथे ४० अंश तपमानाची नोंद झाली आहे.
मालेगाव @ 40.5
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 22:31 IST