लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३२४ वर गेल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पूर्व भागात वाढत असणारा कोरोना आता पश्चिम भागातही फैलावू लागल्याने शहरात चिंंतेचे वातावरण आहे.शनिवारपर्यंत बाधितांचा आकडा २९८ वर होता. शनिवारी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात ७ नवीन रुग्ण होते तर ५ जुने रुग्ण होते त्यांचा दुसरा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याने त्यांना औषधोपचार सुरू ठेवावे लागले. त्यामुळे रुग्णसंख्या २८४ पर्यंत पोहोचली होती, तर २९३ संशयित उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर १५ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातही ५ जुने रुग्ण होते. ज्यांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला त्यात १० नवे रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालात ५६ नमुन्यांतील १४ बाधित होते, तर ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.नूरबाग भागात आठ रुग्ण मालेगाव शहरातून नाशिकच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १२८ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यात ३७ पॉझिटिव्ह, तर ९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ३७ पैकी १० जणांचे अहवाल दुसऱ्यांदा पाठविण्यात आले होते, ते पुन्हा पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रविवारी नवीन २७ बाधितांची भर पडून शहरातील कोरोना रुग्णाची संख्या ३२४ पर्यंत पोहोचली आहे.रविवारी मिळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये आठ रुग्ण नूरबाग भागातील आहेत. त्यात ७ पुरुष आणि एका २४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.इतर रुग्णांमध्ये आदर्शनगरातील महिला (वय ३१), मालेगाव कॅम्पातील पाच वर्षांचा मुलगा, जमीरनगरातील ५५ वर्षीय पुरुष, सोयगावच्या पुंडलिकनगरमधील एक इसम (४५), सर सय्यद नगर, इस्लामपुरा येथील दोन रुग्ण, तर प्रकाश हौसिंंग सोसायटीतील ९ महिन्यांच्या बाळाचा समावेशआहे.रहिवासी शेताकडे...दाभाडीतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागातदेखील कोरोनाची दहशत पसरली आहे. त्यामुळे लोक भीतीने गाव सोडून शेतात, वाडी- वस्त्यांवर जाऊन राहत आहेत. शनिवारी पोलीस नियंत्रण कक्ष, कुंभारवाडा, मोहमद अली रोड, अन्सार गंज आणि योगायोग मंगल कार्यालय परिसरातील रुग्ण पॉझिटिव्ह आले.नागरिकांत चिंतासटाणा नाका, संगमेश्वरातील पाटकिनारा, जगताप गल्ली, हिंमतनगर, पवारगल्ली या भागामध्येही कोरोना पॉझिटिव्ह मिळून आल्याने नागरिकांतून चिंंता व्यक्त होत आहे.सोयगाव मार्केट १0 मेपर्यंत बंदतालुक्यातील ग्रामीण भागात मालेगाव शहरातून येणाºया नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. प्रशासनानेदेखील आता कर्मचाऱ्यांना मालेगावातच निवासास राहणे बंधनकारक केले आहे. मालेगाव शहरात झपाट्याने वाढणाºया कोरोना रुग्णांची साखळी तुटावी यासाठी सोमवार, ४ मेपासून १0 मेपर्यंत सोयगाव मार्केट बंद ठेवण्यात आले आहे, असे सोयगाव मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश सुराणा यांनी कळविले आहे.
मालेगावी ३२४ बाधित; प्रशासन यंत्रणा हादरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:57 IST
मालेगाव : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३२४ वर गेल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पूर्व भागात वाढत असणारा कोरोना आता पश्चिम भागातही फैलावू लागल्याने शहरात चिंंतेचे वातावरण आहे.
मालेगावी ३२४ बाधित; प्रशासन यंत्रणा हादरली
ठळक मुद्देकोरोनाचा कहर : रुग्णांची वाढती संख्या आरोग्य विभागासाठी डोकेदुखी