शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मालेगावी फुुलला भक्तीचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:15 IST

चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या खान्देशातील भाविकांची रिघ लागली असून, रणरणत्या उन्हात आबालवृद्धांसह शहरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. सप्तशृंगमाते की जय, ‘जय अंबे’च्या जयघोषात भगवे झेंडे खांद्यावर घेत डीजेवर भक्तिगीते वाजवत पायी जाणाºया भाविकांमुळे मालेगावी भक्तीचा मेळा फुुलला आहे.

अंबादास चौधरीमालेगाव (कलेक्टरपट्टा) : चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या खान्देशातील भाविकांची रिघ लागली असून, रणरणत्या उन्हात आबालवृद्धांसह शहरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. सप्तशृंगमाते की जय, ‘जय अंबे’च्या जयघोषात भगवे झेंडे खांद्यावर घेत डीजेवर भक्तिगीते वाजवत पायी जाणाºया भाविकांमुळे मालेगावी भक्तीचा मेळा फुुलला आहे. श्रद्धा व भक्तीच्या प्रवाहात सप्तशृंगीच्या चरणी लीन होण्यासाठी धुळे, जळगाव, चाळीसगाव, मालेगावसह मध्य प्रदेश सीमावासीय श्रद्धाळू भक्तांनी मोठ्या उत्साहात दरसालाप्रमाणे यंदाही अनवणी पायांनी सप्तशृंगडाची वाट धरली आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ मानले जाते. त्यामुळेच देवीभक्त भुकेल्या पोटी, अनवणी पायांनी बालगोपालांसह रणरणत्या उन्हात जिवाची पर्वा न करता गडाकडे मार्गक्रमण करत आहेत. गडावर पायी जाणाºया भाविकांची तहान-भूक भागविण्यासाठी शहरातील लोढा कॉलनीतील तरुणांनी गुरूदेव भक्तमंडळाच्या वतीने प्रयत्न केले आहे. पंचवीस वर्षांपासून भक्तसेवा सुरू केली असून, यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जेवण-नास्त्यासह आरोग्य सेवा व पाणपोईचे नियोजन केले आहे.  उन्हात अनवणी पायांनी चालणाºया भक्तांना त्रास होऊ नये यासाठी मालेगाव युनिट महाराष्टÑ सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनद्वारे औषधांचे वाटप करण्यात येत आहे. विधायक युवक व्यापारी मित्रमंडळातर्फे शिवाजी पुतळा परिसरात पाणपोईची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर सटाणा नाका येथेसुद्धा तरुणांनी पाणपोईची सोय केली आहे. टपरीधारकांनी बडवे हॉस्पिटलजवळ देवीभक्तांना आराम करण्याासाठी मंडपासह पाणपोईची सोय केली आहे. विविध दानशूर व्यक्ती, संस्था, तरूणाईचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने भक्त मोठ्या उत्साहात जेवण-नास्त्याचा आस्वाद घेत आई भवानीच्या गाण्यांवर ठेका घेत गडाची वाट चालत आहेत. दरेगावपासून टेहरे चौफुलीपर्यंत जाणाºया भाविकांना शहरवासीयांतर्फे पाणी, औषधे आणि फराळासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे. दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत भर पडत असून, सामाजिक संस्थांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.२५ वर्षांपासून भक्तसेवादेवी भक्त भुकेल्या पोटी, अनवणी पायांनी आवश्यक साहित्य घेऊन बालगोपालांसह रणरणत्या उन्हात जिवाची पर्वा न करता गडाची वाट चालू लागले आहेत. त्यांची तहान-भूक भागविण्यासाठी लोढा कॉलनीतील तरूणांनी गुरूदेव भक्त मंडळाच्या वतीने भक्तसेवा सुरू केली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भाविकांसाठी भोजनाासह आरोग्य सेवेचे नियोजन केले  आहे.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर