शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ९४ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 00:00 IST

लढती रंगणार : गटांतून २१, तर गणांतून ३५ उमेदवारांची माघार

मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद गटांच्या सात जागांसाठी ३१, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६३ असे एकूण ९४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गटांतून २१, तर गणांतून ३५ अशा एकूण ५६ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. आज येथील प्रांत कार्यालयात रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. आजपासून प्रचाराला ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट व पंचायत समितीचे १४ गण आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत गटांसाठी ५६, तर गणांसाठी १०५ नामांकन अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर आज येथील प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश कोळी उपस्थित होते. माघारीची प्रक्रिया पार पडली. इच्छुक उमेदवारांनी गटांत व गणांतील इतर इच्छुकांची मनधरणी करीत माघारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. काही ठिकाणी ‘लक्ष्मीदर्शन’ होऊन माघारीचे सोपस्कार पार पडल्याचे दिसून आले. आज सकाळी ११ वाजेपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची अंतिम वेळ होती. या वेळेत गटातून २१ जणांनी, तर गणातून ३५ अशा एकूण ५६ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता गटांतील ७ जागांसाठी ३१, तर गणांच्या १४ जागांसाठी ६३ असे एकूण ९४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.रावळगाव, दाभाडी, निमगाव, सौंदाणे या चारही गटांत कॉँग्रेसने उमेदवार न दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे, तर गणात कॉँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. त्यामुळे कॉँग्रेसने वडनेर, डोंगराळे, रावळगाव गणांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. गट व गणांत भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. भाजपा, शिवसेनेला अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरणार आहेत. निमगाव गटात चौरंगी लढत होत आहे. निमगाव गट विकास आघाडीनेही स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांबरोबरच निमगाव गट विकास आघाडीचेही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीच्या प्रक्रियेनंतर गणातील उमेदवारांची नावे (कंसात पक्षचिन्ह व पक्षाचे नाव) पुढीलप्रमाणे- वडनेर- सरला खैरनार (कमळ), सुरेखा ठाकरे (धनुष्यबाण), हेमलता पाटील (हाताचा पंजा), निर्मलाबाई वाघ (शिटी). करंजगव्हाण- रावसाहेब निकम (शिटी), परमेश्वर भामरे (घड्याळ), भगवान मालपुरे (धनुष्यबाण), सोमनाथ वडगे (कमळ). डोंगराळे- म्हाळसाबाई ठाकरे (कपबशी), सारजा तलवारे (हाताचा पंजा), बकूबाई पवार (धनुष्यबाण), वंदना बोरसे (कमळ), शेवंताबाई सोनवणे (शिटी). झोडगे- पुष्पा इंगळे (इस्त्री), कमल देसले (शिटी), विजया देसले (धनुष्यबाण), सुवर्णा देसाई (कमळ). कळवाडी- शंकर बोरसे (धनुष्यबाण), गोविंदा बोराळे (हत्ती), नाना बोराळे (कपाट), कल्पना मोहन (घड्याळ), सचिन वाघ (कमळ). चिखलओहोळ- राधाबाई पवार (घड्याळ), बेबीबाई पिंजन (कमळ), सरला शेळके (धनुष्यबाण), वंदना सूर्यवंशी (कपबशी). वडेल- काशीनाथ वाघदरे (कपबशी), नंदलाल शिरोळे (कमळ), महादू सोनवणे (धनुष्यबाण). रावळगाव- भुरा गायकवाड (नारळ), बापू पवार (कमळ), अर्जुन सोनवणे (कपबशी), निवृत्ती सोनवणे (गॅस सिलिंडर), वेणू सोनवणे (बॅट), शांताबाई सोनवणे (हाताचा पंजा), सारिका सोनवणे (धनुष्यबाण). दाभाडी- द्वारकाबाई गायकवाड (घड्याळ), मनीषा माळी (धनुष्यबाण), कमळाबाई मोरे (कमळ), सुनंदा सोनवणे (कपाट). पाटणे- मुरलीधर खैरनार (नारळ), राजेंद्र खैरनार (घड्याळ), अरुण पाटील (कमळ), कैलास बागुल (बॅट), नंदलाल शेवाळे (धनुष्यबाण). चंदनपुरी- रोहिणी अहिरे (धनुष्यबाण), मनीषा कदम (गॅस सिलिंडर), कल्पनाबाई पवार (कपबशी), अंजनाबाई शेलार (कमळ), प्रतिभा सूर्यवंशी (घड्याळ). निमगाव- दीपक अहिरे (कमळ), अनिल तेजा (कपबशी), अशोक शेवाळे (धनुष्यबाण), समाधान शेवाळे (घड्याळ). सौंदाणे- अलका पवार (हाताचा पंजा), संगीता वाघ (कमळ), मनीषा सोनवणे (धनुष्यबाण). जळगाव- गणेश खैरनार (कमळ), वसंत दुकळे (घड्याळ), योगेश निकम (कपबशी), शांतीलाल पवार (धनुष्यबाण). (वार्ताहर)