शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या हक्कासाठी लढणारा पुरुष कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:33 IST

नाशिक : महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या हक्काचा जागर केला जातो आणि हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महिला किंवा त्यांच्या संस्थांचा आवर्जून ...

ठळक मुद्देसंतोष जाधव यांचा उपक्रम नेमप्लेटवर स्त्रियांची नावे; आरोग्यासाठी जनसुनवाई

नाशिक : महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या हक्काचा जागर केला जातो आणि हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महिला किंवा त्यांच्या संस्थांचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाशिकमध्ये मात्र संतोष जाधव हा युवा कार्यकर्ता लोकनिर्णय या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असून, त्यांच्या प्रयत्नातून पाचशेहून अधिक महिलांची पतीच्या बरोबरीने घरावर नावे आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक जनसूनवाई झाल्याने महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीदेखील करण्यात येऊ लागली आहे.नाशिक शहरातील फुलेनगर झोपडपट्टी हा कष्टकऱ्यांचा रहिवासी भाग. या भागात मोलमजुरी करणारी कुटुंबे मोठ्या प्रमाणात राहतात. त्याच भागात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून संतोष जाधव हे लोकनिर्णय संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहेत. या भागातील अज्ञान, निरक्षरता अशा बाबींमुळे अनेक अडचणी आहेत. त्या पार्श्वभूमीवर याठिकाणातील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत सहजतेने त्यांनी कामे केली आहेत. येथील मुलांशी बोलताना अनेकदा कुटुंबातील मुला-मुलींमध्ये भेद होत असल्याचे लक्षात आले. घरातील डब्यांवर, भांड्यांवर मुलांचीच नावे असतात. मुलींना टाळले जाते, त्यावरून संबंधित कुटुंबांशी संवाद साधताना त्यांना जाणीव करून देण्यात आली. परंतु ही घरातील बाब त्यामुळे दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणची वस्तू म्हणजे घरावरील नेमप्लेट तेथे फक्त कर्त्या पुरुषाचेच नाव असते. त्यामुळे आई किंवा पत्नीचे नावदेखील टाकावे यासाठी कुटुंबांशी संवाद साधण्यात आला. महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला, शिवाय पुरुष मंडळीही तयार झाली आणि आज झोपडपट्टीत सुमारे पाचशे घरांवर महिलांची नावे दिसत आहेत.रुग्णालयात झाल्या अनेक सुविधा उपलब्धयाच भागात आरोग्याचा प्रश्न गंभीर होता. महापालिकेने याठिकाणी रुग्णालय बांधले परंतु त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने प्रसूती होत नव्हत्या. त्याचप्रमाणे या रुग्णालयात कोणी दाखल झाले की, त्यांना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात किंवा तेथून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. २०१४ पासून या भागात तीन जनसूनवाई घेण्यात आल्या. ‘लोकनिर्णय’ने परिसरातील आणि रुग्णालयात दाखल महिलांचे सर्र्वेक्षण करून वस्तीत किती महिला प्रसूत झाल्या, त्यांची नोंदणी कधी झाली होती आणि त्यांना रुग्णालयातून काय सांगण्यात आले याचा सर्व्हेच करण्यात आला आणि तो मांडण्यात आल्याने आता रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ नियुक्त करण्यापासून ते सोनोग्राफीपर्यंतच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या.आहेत.मुंबईच्या कोरो या संस्थेच्या मदतीने कौटुंबिक हिंसाचार थांबविण्यासाठी समुपदेशन केंद्र चालवण्यात येते. कौटुंबिक वाद टळले नाहीत तर महिलांना विधी सेवा प्राधीकरणातून मोफत कायदेशीर मदतदेखील केली जाते. त्यामुळे अनेक महिलांना आधार मिळाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला