शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
3
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
4
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
5
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
6
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
7
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
8
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
9
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
10
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
11
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
12
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
13
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
14
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
15
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
16
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
17
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
18
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
19
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
20
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

मालधक्का झाला ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: June 4, 2015 00:34 IST

कोट्यवधी रुपयांचा माल : बंद राहण्याच्या अफवेचा परिणाम

नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मालधक्का तीन-चार महिने बंद राहणार असल्याची चर्चा व अफवा पसरल्याने सीमेंट, खत कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा जादा माल पाठविण्यात आल्याने रेल्वे मालधक्का प्लॅटफॉर्म व गुदाम हाऊसफुल्ल झाले आहे.सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला असून, पर्वणीच्या काळात तीन-चार महिने रेल्वे मालधक्का बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा असून, तशी अफवादेखील पसरली आहे. मालधक्का बंद ठेवण्याबाबतचा अद्याप रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, सेंट्रल रेल्वे साईड वेअरहाऊस मालधक्का बंद ठेवण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.रेल्वे प्रशासनाकडून सीमेंट, खत, स्टीलच्या कंपन्या, व्यापारी, कार्टिंग एजंट यांना कुंभमेळा तोंडावर आला असतानासुद्धा रेल्वे मालधक्का सुरू ठेवणार की बंद राहणार याबाबत अद्याप अधिकृतपणे कळविलेले नाही. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कंपन्यांनी घेतली धास्तीपावसाळ्यात बाजारात खताला मोठी मागणी असते. पर्वणी काळात मालधक्का बंद ठेवण्याचा निर्णय झाला तर बाजारात सीमेंट, खत, स्टीलचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढ, काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे धास्तावलेल्या सीमेंट, खत, स्टीलच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर माल पाठविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत सीमेंट, खतांच्या विविध कंपन्यांचा सात रॅकमधून माल आला आहे. पाच रॅक रस्त्यात असून, गुरुवार-शुक्रवारी नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर पोहचतील.पाय ठेवायला जागा नाहीमालधक्क्यावर मोठ्या प्रमाणात सीमेंट, खत येत असून, ते रेल्वेच्या रॅकमधून उतरवून लागलीच खासगी ट्रकने उचलून नेले जात आहे. तरीदेखील रेल्वे मालधक्का प्लॅटफॉर्म व गुदाम सीमेंट, खत, स्टीलने हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. दररोज २५०-३०० ट्रकमधून रेल्वे रॅकमधून आलेला माल वाहून नेला जात आहे. सध्या सेंट्रल वेअर हाऊसच्या गुदाममध्ये अन्नधान्याच्या गोण्या ठेवायला जागा नसल्याने आठ दिवसांपूर्वी रेल्वेने आलेले अन्नधान्य मनमाडला पाठवून दिले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा व त्यामुळे मालधक्का सुरू राहणार की बंद याचा निर्णय भिजत पडल्याने कंपन्या, व्यापारी, कार्टिंग एजंट, माथाडी कामगार, ट्रक चालक-मालक यांनी धास्ती घेतली आहे. (प्रतिनिधी)