शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबादला तिघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:04 IST

मखमलाबाद परिसरात गँगवार माजविण्याच्या इराद्याने तयारी करून प्रतिस्पर्धींना धमकाविण्यासाठी येत असल्याची कुरापत काढून चौघा संशयितांनी तिघा युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात घडली.

पंचवटी : मखमलाबाद परिसरात गँगवार माजविण्याच्या इराद्याने तयारी करून प्रतिस्पर्धींना धमकाविण्यासाठी येत असल्याची कुरापत काढून चौघा संशयितांनी तिघा युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात चौघा संशयितांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रोहित पवार, अभिषेक गिरी, प्रकाश शेंडगे व सनी शेलार हे चौघेजण गवळी यांच्या हॉटेलजवळ गप्पा मारीत असताना संशयित आरोपी हातात धारदार शस्त्रे घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी तुम्ही माजले का गँग बनवीत आहे, सर्वांना मारून टाका, असे म्हणत शेंडगे याच्यावर वार केला, त्यावेळी पवार व गिरी हे निघून जात असताना सर्व संशयितांनी त्यांना अडवून तुम्ही किरण भडांगे यांच्यासमवेत राहून गँग बनवून आमच्या गावात दादागिरीसाठी येता का, असे म्हणून दोघांवर कोयत्याने व काठीने हल्ला चढविला. त्यानंतर मारहाण झालेले युवक मित्राच्या चारचाकीतून जात असताना संशयितांनी कारच्या काचा फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मारहाणप्रकरणी शांतीनगर पिंगळे मळा येथे राहणाऱ्या रोहित योगेश पवार यांनी दिलेल्या तक्रार दिली असून, मखमलाबाद येथील पंकज दराडे, श्रावण भसरे, सुनील धोत्रे, नितीन पिंगळे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारचाकीत शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटकमखमलाबाद गावात बसस्थानकाशेजारी रस्त्यात उभ्या असलेल्या फॉर्च्युनर चारचाकीत धारदार तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी मखमलाबादच्या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चारचाकी व शस्त्र जप्त केले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे कर्मचारी गणेश रेहरे व त्यांचे सहकारी रविवारी रात्री मखमलाबाद गावात गस्त घालीत असताना फॉर्च्युनर या चारचारी वाहन (क्रमांक एमएच १५, एफटी ५९९९) रस्त्याच्या मध्यभागी संशयास्पद उभी दिसली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता गाडीत एक लोखंडी धारदार तलवार आढळून आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी प्रवीण ज्ञानेश्वर काकड आणि मयूर बाळासाहेब दराडे या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी