शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

'ऑपरेशन पूर्वी भूल तज्ज्ञाकडून एक तपासणी जरूर करून घ्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 19:24 IST

भूल देण्या पूर्वीची भूल तज्ज्ञाने केलेली तपासणी अत्यंत मोलाची असते. जसा विमानाचा टेक ऑफ महत्वाचा ज्याला भूल तज्ज्ञ इंडक्शन ऑफ अनेस्थेसीआ अस म्हणतात...

ठळक मुद्देभूल तज्ज्ञ ऑपरेशन पार पडण्यास अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतातभूल दिल्यानंतर सुद्धा अचानक काही अडचणी उद्भवू शकतात

नाशिक : 16 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भूल शास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातोप्रत्येक दिवसच एक वेगळी ओळख घेऊन येतोय मोबाईल मुळे जग खूप जवळ आले आहेसंपर्क एकदम सोपा आणि सहज त्याच अनुषंगाने भूल शास्त्र या विषयी नेमकं काय माहीत करून घेतलं पाहिजे आणि काय समजून घेतलं पाहिजे...lएक विमान प्रवास आपण उदाहरण म्हणून घेतला तर विमान प्रवासापूर्वी कोणत्या कंपनी च विमान विमान सेवा कुठून कुठे त्याचे भाडे किती प्रवास करणारी व्यक्ती कोण वय काय तुमच्या सोबत असलेल्या वस्तू काय विमान कोण चालवणार आहे विमानात बसल्यावर कोण कोण एअर होस्टेस सेवा देतील या सगळ्याची माहिती प्रवाशास असते द्यावी लागते. अगदी तसेच पेशंट ला आजार कोणता किती दिवसापासून त्या संबंधी तपासणी रिपोर्ट काय आले आहेत ऑपरेशन करणार कोण मागे झालेले आजार असतील तर आत्ताच आजार आणि त्यांचे ऑपरेशन करताना परिणाम काय होतील आणि भूल देताना किंवा दिल्या नंतर उदभवू शकणारे प्रसंग ह्या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून भूल तज्ज्ञ भूल कोणती द्यायची हे ठरवत असतात. भूल देण्या पूर्वीची भूल तज्ज्ञाने केलेली तपासणी अत्यंत मोलाची असतेजसा विमानाचा टेक ऑफ महत्वाचा ज्याला भूल तज्ज्ञ इंडक्शन ऑफ अनेस्थेसीआ अस म्हणतात तितकचठराविक लेवल ला भूल दिलेली कायम सतत राखून पेशंट चे पंचप्राण फुफुसे हृदय मेंदू लिव्हर आणि किडनी या वर भूल तज्ज्ञ अष्टवधानी असल्यागत अत्यंत कसोशीने आपल्या बुद्धी आणि स्किल चा वापर करून पेशंट सुरक्षित ठेवून ऑपरेशन पार पडण्यास अत्यंत महत्वाची जणू वैमानिकाची भूमिका पार पाडतात.आता विमान प्रवासातील एअर टरबूलन्स जसा कधी कधी समोर उभा ठाकतो तसेच भूल दिल्यानंतर सुद्धा अचानक काही अडचणी उद्भवू शकतात ज्या प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा आजार आणि त्याची प्रकृती नुसार बदलतात

ऑपरेशन संपत आले की विमानाचं लँडिंगतेव्हा देखील प्रवाशांना सूचना सीट बेल्ट बांधणे मोबाईल बंद करणे या सारख्या सूचना दिल्या जातात सोबत वैमानिक आता काय करणार आहे हे देखील सांगितलं जातं अगदी त्याच प्रमाणे भूल दिलेल्या व्यक्तीला ऑपरेशन संपल्या नंतर पुन्हा पूर्ववत स्थिती म्हणजे शुद्धधी वर आणण्यासाठी पेशंट ची स्थिती श्वसन हृदयाची गती किडनी लिव्हर ब्रेन ज्यांना व्हायटल ऑर्गन्स असे म्हणतात त्यांची उमेदवारी आणि कामाची टक्केवारी विचारात घेऊन पुन्हा पेशंटला पूर्व स्थितीत आणायचं काम अत्यंत कसोशीने भूल तज्ज्ञ करतात.मानवी शरीर अत्यंत कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचे असले तरीही कोणी केव्हा काय काम करायचं आणि एखाद्या सिस्टीम मध्ये बिघाड झाला तर त्याचे शरीरावरील होणारे ऑपरेशन दरम्यान चे परिणाम मोजण्याची अत्यंत अद्ययावत उपकरणे उपलब्ध असली तरीही भूल तज्ज्ञांचा अनुभव स्किल आणि प्रगाढ अभ्यास काय निर्णय घ्यायचा याचे निर्णय घेतोअनेक जणांना भूल शास्र हे केवळ एक इंजेक्शन दिल की संपलं एव्हढीच व्याप्ती माहीत असतेपण ह्या दिलेल्या इंजेक्शन चे पुढील 3 तास फुफुसे किडनी लिव्हर ब्रेन हृदय या वर काय परिणाम होतात आणि त्याचा रिस्पॉन्स कसा मिळत जातोय या सगळ्या गोष्टी सांभाळण्यात भूल तज्ज्ञांची अक्षरशःकसोशी लागतेकाही वेळा विमानस लँडिंग साठी पार्किंग नसाल तर हवेत तरंगत ठेवतात वैमानिकतसच अगदी पेशंट भूल दिल्यावर बाहेर आल्यानंतर पेशंट ने पूर्ण स्वस्थ असल्याचे सिग्नल दिल्या नंतरच पेशंट ला ऑपरेशन थिएटर बाहेर काढले जाते. पेशंट ऑपरेशन नंतर आय सी यु किंवा पोस्ट ऑप रूममध्ये असताना पेशंट च्या नातेवाईकांनी डॉक्टर नि सांगितलेल्या सूचना चे काटेकोर पालन करणे गरजेचे असते.या विभागातही पेशंट ला स्वस्थ ठेवणे हाच उद्देश असला तरी भूल आणि ऑपरेशन ला त्याच शरीर कस आणि काय साथ देते हे म्हत्वाचेच असते. आता दीर्घ विमान प्रवास नंतर जेट लैग असतो तसाच भूल आणि ऑपरेशन चा ही थकवा आणि व्हाटल ऑर्गन्स ची कार्यक्षमता यावर कमी जास्त परिणाम हा होतोच त्या नुसार पुढील काळजी काय घ्यायची याच्या सूचना दिल्या जातात.थोडक्यात काय ऑपरेशन च्या घटनेवर भूल ही निवडणूक घेतली की महत्वाचे 5 उमेदवार फुफुसे ब्रेन लिव्हर किडनी हृदय आपली उमेदवारी लढताना मधेच काही अपक्ष अनपेक्षित रिस्पॉन्स ऐनवेळी ह्या स्वरूपात उभे राहिल्यास ऑपरेशन भूल निवडणूक गुंतागुंतीची आणि सोपी न होता अवघड होऊन बसतेत्यामुळे आपला आजार लपवू नका ऑपरेशन पूर्वी भूल तज्ज्ञाकडून एक तपासणी जरूर करून घ्या.कोणती भूल द्यायची हे त्यांना ठरवू द्या आपल्या मनातील शंका त्यांना जरूर विचारा पूर्वी चा भूल घेतली असेल तो अनुभव डॉक्टर सोबत शेअर करा आणि आत्म विश्वास कायम असू द्यात स्वतःवर आणि डॉक्टर वर देखीलमग बघा तुम्ही सहज बाहेर पडला ऑपरेशन च्या दिव्यातून...

- डॉ. संज्योति सुखात्मे, नाशिक 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य