शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा: अपूर्वा जाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.

ठळक मुद्देविठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे गुणगौरव

नाशिक : अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष वक्त्या म्हणून जाखडी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होत्या. यावेळी जाखडी यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनविण्याचे आवाहन करतानाच त्यांना अवकाश संशोधन क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे स्पष्ट केले. देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांवर पालकांनी आपले मते न लादता त्यांचा कल जाणून घेत त्यांच्या करिअरचे भवितव्य ठरविण्याची गरज असल्याचे सांगत तणावमुक्त शिक्षण देण्याचे आवाहन केले. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष सुनील निकुंभ यांनीही समाजातील शैक्षणिक उन्नतीबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना नवनवी आव्हाने खुणावत असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संदीप खैरनार व पल्लवी कापडणे यांनी केले. व्यासपीठावर समाज संस्थेचे निमंत्रित विश्वस्त अमरशेठ सोनवणे, उपाध्यक्ष मुकुंद मांडगे, मुख्य सचिव संजय खैरनार, कार्यालय प्रमुख हेमंत सोनवणी, महिला कार्याध्यक्ष वंदना जगताप, महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्ष सुनीता शिंपी, राजेंद्र वाडीकर, ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र जगताप, सचिव मयूर सोनवणे, महिला अध्यक्ष प्रफुल्लता सोनवणी, सहसचिव रोशनी देवरे आदी उपस्थित होते.पूरग्रस्तांसाठी मदतनिधीविठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने यावेळी सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी २१ हजार रुपयांचा मदतनिधी सुपुर्द करण्यात आला. याचबरोबर ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यंदाही ट्रस्टतर्फे नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक