शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

टोमॅटो निर्यातीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:05 IST

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्देजयदत्त होळकर : लासलगांव बाजार समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील नाशिक, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपुर इ. जिल्हे टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. चालु वर्षी चांगला पाऊस आणि पोषक हवामान यामुळे राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज साधारणत: ९ ते १० हजार टोमॅटो क्रेटस्ची आवक होत असुन सदरचा टोमॅटो कमीत कमी रू. ५०, जास्तीत जास्त रू. १४१ व सर्वसाधारण रू. ११५ प्रती २० किलो क्रेटस् प्रमाणे विक्र ी होत आहे. लवकरच टोमॅटो आवकेत वाढ होणार असुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय टोमॅटो पाठविणेस सीमाबंदीची अडचण असल्याने मागणी व पुरवठ्यातील असमतोलामुळे दिवसेंदिवस टोमॅटोचे दरात घसरण होत आहे. टोमॅटो हा शेतीमाल नाशवंत असल्याने त्याची काढणीनंतर तात्काळ विक्र ी, प्रतवारी व पॅकींग करून तो देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार त्यांचा टोमॅटो पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरीयाणासह देशातील इतर राज्यात ट्रकद्वारे पाठवितात तर निर्यातक्षम टोमॅटो पाकिस्तान, बांग्लादेश, ओमान, दुबई, मलेशिया, कतार इ. देशात निर्यात करतात. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा सर्वात मोठा आयातदार देश असल्याने दरवर्षी टोमॅटो हंगामात १५ आॅगष्ट, बकरी ईद, मोहरम इ. सणांमुळे तसेच दोन्ही देशातील नेहमीच्या तणावाचे वातावरणामुळे भारत-पाकिस्तानची सीमा बंद रहात असल्याने एैन हंगामात टोमॅटोची निर्यात होत नाही. त्यामुळे दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना नाईलाजास्तव आपला टोमॅटो मिळेल त्या भावात विक्र ी करावा लागतो. पाकिस्तान पाठोपाठ बांग्लादेश, दुबई, मलेशिया, कतार इ. देश भारतीय टोमॅटोचे प्रमुख आयातदार देश आहे. मात्र दरवर्षी या ना त्या कारणास्तव भारतीय सीमा बंद रहात असल्याने टोमॅटो शेतीमालाला त्याचा फटका सहन करावा लागतो. भारतीय टोमॅटोची चव व प्रत चांगली असुनही केवळ इराणमधुन स्वस्त टोमॅटो मिळत असल्याने दुबईमध्ये इराणच्या टोमॅटोला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. उच्चप्रतीचे व निर्यातक्षम टोमॅटो बियाणे, वेगवेगळी रासायनिक खते व किटकनाशके, टोमॅटो लागवडीपासुन टोमॅटो विक्रीपर्यंत लागणारी मजुरी इ. चा खर्च विचारात घेता दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात टोमॅटोची विक्र ी करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या शेतीमालाची इतर देशांच्या शेतीमालाशी स्पर्धा करतांना प्रसंगी येथील शेतकऱ्यांना बँका, वित्तीय संस्थांकडुन कर्ज घेऊन शेतीच्या मशागतीसाठी निधी उपलब्ध करावा लागतो. परंतु शासनाच्या ध्येय धोरणांमुळे अनेक वेळा येथील शेतकºयांना उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे येथील खरेदीदारांना त्यांचा टोमॅटो हा शेतीमाल परदेशी बाजारपेठेत पाठविणेसाठी पाकिस्तान, बांग्लादेश, मलेशिया, दुबई, ओमान, कतार इ. देशांच्या तसेच भारतातील सर्व राज्यांच्या सीमा फक्त शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवणेबाबत तसेच टोमॅटो वाहतुकीवरील खर्च कमी होणेकामी कमी करणे करणेबाबत आपले स्तरावरून प्रयत्न व्हावा अशी मागणी होळकर यांनी निवेदनात केली आहे.उच्च प्रतीचे वेगवेगळे बियाणे आणि नवनविन तंत्रज्ञान यामुळे टोमॅटोची उत्पादन क्षमता वाढली असुन यंदा टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर पीक आले आहे. मात्र दरवर्षी १५ आॅगस्ट, बकरी ईद व मोहरमचे सणादरम्यान पाकिस्तान बॉर्डर हमखास बंद होते. केंद्र शासनाने याबाबतीत तातडीने लक्ष घालून भारतातील टोमॅटो उत्पादकांना न्याय द्यावा.- संदीप दरेकर, उपसभापती, लासलगांव बाजार समिती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड