शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 00:48 IST

पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून पुलांची पाहणी तसेच डागडुजी हाती घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देराधाकृष्ण गमे : पुलांची पाहणी; डागडुजी करण्याच्या सूचना

नाशिक : पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून पुलांची पाहणी तसेच डागडुजी हाती घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सून पूर्व तयारीचा विभागीय आढावा, विभागीय दक्षता व नियंत्रण, महिला व बालकल्याण विशाखा समितीचा आढावा आणि कोविड व्यवस्थापन तसेच अनुषंगिक विषयांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. मान्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारणासाठी नियोजन करून सज्ज रहावे. तसेच प्रत्येक विभागाने चोवीस तास नियंत्रण कक्षाची स्थापना करू त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोच करणे आणि हे साहित्य चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्पुरत्या निवारा जागांची निश्चिती करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या आहेत.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, जलसंपदाचे डॉ. संजय बेलसरे, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजेंद्र भोसले, संजय यादव, अभिजित राऊत, राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राजेंद्र क्षीरसागर, वान्मथी सी, डॉ. बी. एन. पाटील, रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील,  मनोज पाटील, चिन्मय पंडित आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.पूरपरिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. तसेच सर्व पुलांचे निरीक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी. यासोबतच दरडी कोसळणे, वीज पडणे, झाडे रस्त्यावर पडून वाहतूक बंद होणे यावर संबंधित विभागाने व्यवस्था करावी. पुराचा धोका असणाऱ्या गावांना हवामानासंबंधी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याबाबत प्रयत्न करावेत, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपद्‌ग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी, निवारा, कपडे, इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून पुरात घरे वाहून गेलेल्या निराश्रितांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. महसूल विभागाने मदत व पुनर्वसन आणि पंचनामे करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे