शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील मका गुदमरतोय पोळीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 23:56 IST

खरीप हंगामाच्या शेतकामांना वेग आला असला तरी मागील वर्षी मोठ्या मेहनतीने पिकवलेला खरीप हंगामातील मका मात्र दरवाढीच्या आशेने आजही पोळीमध्येच गुदमरत आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : कमी दर अन् लॉकडाऊनचा फटका; शेतकरी हवालदिल

जळगाव नेऊर : परिसरात खरीप हंगामाच्या शेतकामांना वेग आला असला तरी मागील वर्षी मोठ्या मेहनतीने पिकवलेला खरीप हंगामातील मका मात्र दरवाढीच्या आशेने आजही पोळीमध्येच गुदमरत आहे.अतिवृष्टी, लष्करी अळी या संकटातून वाचवलेला मका शेतकऱ्यांनी पोळी मारून ठेवला आहे. कांदा लागवड, काढणी आदी कामे आटोपून अनेक शेतकरी मार्च, एप्रिल महिन्यात मका काढतात.मात्र यावर्षी कोरोनाचा फटका बसला व बाजारभाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी मका तसाच ठेवला आहे. शासनाने एकरी बारा क्विंटल मका एक हजार ७६० या दराने नाफेडमार्फत खरेदी सुरू केली आहे; मात्र ती रब्बी हंगामातील मक्यासाठी आहे. त्यामुळे खरीप मका उत्पादक शेतकºयांच्या पदरी निराशा पडली आहे. सात ते आठ महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या मक्याच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट येत आहे. शासनाने खरीप, रब्बी असा भेदभाव न करता सरसकटमका खरेदी करावी, अशीमागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.कोरोनाच्या लॉकडाऊन व संचारबंदीने वाहतूक बंदी झाली. परिणामी शेतकºयांना मका काढता आला नाही. मका काढून जास्त दिवस ठेवल्यास कणसांना कीड लागते. तसेच कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्याने त्याचा फटका मका उत्पादकांना बसला आहे. परिणामी अडचणीत आलेल्या शेतकºयांना मिळेल त्या दरात मका विक्र ी करावा लागत आहे.

मागील वर्षी तीन एकरावर मका पिकाची लागवड केली होती. अतिवृष्टी, लष्करी अळी यातून कसेबसे पीक वाचवून दर वाढतील या आशेने मका पोळ मारून ठेवला. सुरु वातीला दोन हजारावर गेलेला मका आज मात्र आठ महिने थांबूनही बाराशे रु पयांच्या आसपास विकावा लागत आहे. यातून खर्चदेखील वसूल होत नाही. शासनाने खरीप-रब्बी असा भेदभाव न करता सरसकट मका खरेदी करावा.- ज्ञानेश्वर दराडे,मका उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी