शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मका शेती हिरव्या शालूने नटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:31 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मका पीक सध्या जोमात असल्यामुळे बळीराजांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झाले आहे. तालुक्यातील मका शेतीने जणू हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देसुगीचे दिवस : रोगाला रोखण्यात यश; हमीभाव मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मका पीक सध्या जोमात असल्यामुळे बळीराजांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झाले आहे. तालुक्यातील मका शेतीने जणू हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे.खरीप हंगामातील मका पीक दोन धोरणात्मक दृष्टिकोनातून घेतले जाते. एक जनावरांसाठी चारा व दुसरे पुढील हंगामासाठी नगदी भांडवल तयार करण्यासाठी. यंदा मका घेताना शेतकरीवर्गामध्ये द्विधाअवस्था होती. कारण पावसाचा लहरीपणा वेळोवेळी निर्माण होत होता. परंतु तालुका कृषी विभागाने शेतकरीवर्गासाठी योग्य वेळी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे नियोजन करून मका पिकाचे घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन व नियोजन यांची सांगड घालून मका लागवडीवर भर दिला.मागील हंगामात मका पिकांवर अनेक संकटे निर्माण झाली होती. त्यात प्रामुख्याने लष्करी अळीने मका पिकाला हैराण केले होते. त्यामुळे जवळजवळ ४० ते ५० टक्के उत्पन्नाला मोठा फटका बसला होता. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात शेतकऱ्यांना यशयंदा कृषी विभागाने योग्य नियोजन करून तालुक्यातील शेतकरीवर्गाचे मका क्षेत्र कसे वाढविता येईलयावर भर दिला होता. खरिपातील मका जनावरांसाठी चारा रूपाने चांगला मानला जातो. भरपावसाळ्यातही मका येत असल्यामुळे तिच्यात चवदारपणा जास्त असतो व कणीस दाणेदार पद्धतीचे तयार होत असल्याने शेतकरीवर्गाला उत्पन्नवाढीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. यंदा मका पिकाने अगोदरचा उगवण क्षमतेचा कालखंड जर सोडला तर या पिकाने सर्वच रोगांवर मात केलेली आहे.

आजही या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.

खरीप हंगामात तालुक्यातील ७० टक्के शेतकºयांची मका पिकाला पसंती.यंदा मका पिकावर कुठल्याही प्रकाराचा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही.कोरोनाच्या काळातील झालेले नुकसान भरून निघण्याची अपेक्षा.

मागील वर्षीच्या तुलनेत मक्याच्या हेक्टरी सरासरी उत्पन्नात वाढ.शेतकरीवर्गाच्या मेहनतीमुळे मका पिकाला यंदा सुगीचे दिवस येणार हे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. मका पिकाचे सरासरी उद्दिष्टे यंदा पूर्ण होईल. सध्या तालुक्यात दिसत असल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.- पंकज शिवले,मका उत्पादक, परमोरी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी