शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:28 IST

पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देबाजरीचे क्षेत्र वाढणार : खरिपाची ४२ टक्के पेरणी

नाशिक : पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या ४२ टक्के पेरण्या झाल्या असून, यापुढे मक्याचे पीक घेणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यात प्रामुख्याने अळ्यांकडून मक्याची पाने खरबडून खाण्यास सुरुवात झाली असून, कणसांमध्ये शिरून दाण्यांवर प्रभाव टाकू लागल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. शेतकºयांना लष्करी अळीमुळे क्षेत्रावर दुसरे पीक घ्यावे किंवा नाही याची काळजी वाटू लागली आहे. मालेगाव, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते; परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात या तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे मक्याची पेरणी पाहिजे तितकी होऊ शकली नाही. पाऊस अजून लांबला तर यापुढे मक्याचे पीक घेणे शेतकºयांना व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी बाजरी, ज्वारीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मक्याचे क्षेत्र घटण्याची शक्यताजाणकारांच्या मते यापुढे शेतकरी मक्याची फारशी पेरणी करू शकणार नाही. मक्याचे पीक तीन ते साडेतीन महिन्यांत येते, त्यानंतर शेतकरी आॅक्टोबरमध्ये लेट खरीप कांद्याची पेरणी करायला मोकळे होतात किंबहुना त्यांना शेत मोकळे मिळते. अशा परिस्थितीत आता उशिराने मका पेरून लेट खरीप कांद्याचे नुकसान करून घेण्यास कोणताही शेतकरी तयार होत नाही. त्यामुळे यंदा मकाऐवजी बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, बाजरीची पेरणी आॅगस्ट महिन्यापर्यंत केली तरी चालते त्यामुळे आत्तापर्यंत फक्त ५० हजार हेक्टरवरच बाजरीची पेरणी होऊ शकली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती