शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मेनरोड मनपा कार्यालय स्थलांतराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:19 IST

मेनरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता.

इंदिरानगर : मेनरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. सदर इमारतीमधील कामकाज स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अजूनही जुन्याच इमारतीत कामकाज सुरू आहे.गेल्या महिन्यात प्रभाग सभेत धोकादायक इमारतीतून विभागीय कार्यालय स्थलांतरित करावे, त्यासाठी नगरसेवक मुशीर सय्यद व नगरसेवक श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच इतर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तरीही अद्यापपर्यंत विभागीय कार्यालय स्थलांतर करण्यात आले नाही. विभागीय कार्यालयात सुमारे पाचशे कर्मचारी येथे काम करतात. तसेच दररोज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटनेची वाट पाहते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय कार्यालय कर्मचारी आणि नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असून, द्वारका सर्कललगत मध्यवर्ती ठिकाणी पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून आहे. या कार्यालयात वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनतळ अपुरे पडत असल्याने तेथे येणाºया नागरिकांना वाहन लावण्यास जागा पुरत नाही. नाईलाजाने मेनरोडवर वाहने लावावी लागतात. येथे पिण्याची पाण्याची सोयसुद्धा नाही.मुहूर्त लागेनामहापालिकेचे बहुतेक विभागीय कार्यालय नूतन इमारतीत स्थलांतर झाले आहे. पूर्व विभागाचे विभागीय कार्यालय नूतन इमारतीत केव्हा स्थलांतरित होईल. सदर पुरातन इमारतीच्या जतन करावे विभागीय कार्यालयात येताना मेनरोड येथील रस्त्यावर ठिकठिकाणी उभे असलेले विक्र ेत्यांच्या हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांना मार्गक्र मण करणे सुद्धा मुश्किल होते, तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने लाखो रु पयांचा घरपट्टी व पाणीपट्टीच्याद्वारे महसूल गोळा केला जातो, परंतु अद्यापही नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.नगरसेवकांना चारचाकी वाहने लावण्यासाठीसुद्धा जागा नसते. त्यामुळे बहुतेक नगरसेवक शालिमार येथील मनपाच्या वाहनतळावर वाहने लावून पायपीट करीत मेनरोड येथील कार्यालयात येतात. सर्वच दृष्टीने सदर कार्यालय गैरसोयीचे ठरत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक