शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

संगणकाच्या युगात टपाल पेटी लुप्त होण्याच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 00:20 IST

सायखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकाच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतले आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहे. लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.

ठळक मुद्देसंदेशवहनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा होतोय वापर

सायखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकाच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतले आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहे. लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.गतिमान युगात याची जागा आता संगणकाने घेतली आहे.आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव आदर आपल्या लेखनातून होणारी देवाण-घेवाण मोबाइल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची, त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे. प्रगती होत परस्पर संवादाची साधने बदलली. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचे जीवन बदलले. प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा, आता मात्र तो कुठेही दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्र गोळा करून पुढे पाठवत असे, आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचले नाही, तिथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावला आहे. पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती. दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा. आजच्या संगणकीय युगात यात अमूलाग्र बदल झाले आहेत. बसल्या जागी मोबाइलच्या मदतीने जगातील कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही सारी आधुनिक प्रगतीची किमया आहे. नाही तर काही वर्षांपूर्वी ताई, माई, आक्का, पोस्टमन मामांची वाट पाहत असत. कधी कधी तर ह्यआमचं काही पत्रबित्र आलंय काह्ण अशी विचारणादेखील पोस्टमनकडे केली जायची.पूर्वी पत्राला खूप महत्त्व होते, त्यामुळे नोकरभरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारेच मिळायचे. त्यात लग्नपत्रिकेपासून तर नोकरभरतीची ऑर्डर, न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या नोटिशी, मनिऑर्डर, सर्व प्रकारचे निरोप पोस्टमन मामामार्फत मिळत असत. परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपालपेटी दिसेनाशी झाली आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसGovernmentसरकार