महिंद्रा कंपनी सुरू होणार पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:20 PM2020-04-29T23:20:20+5:302020-04-29T23:26:39+5:30

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.

Mahindra company to start but ... | महिंद्रा कंपनी सुरू होणार पण...

महिंद्रा कंपनी सुरू होणार पण...

Next

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेला कॅन्टोन्मेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तीन हजारांवर उद्योगांनी आॅनलाइन परवानगी मागितली होती. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाºया १,६२७ उद्योगांना रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अँड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजाराच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.
जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही. त्याशिवाय या मोठ्या उद्योगातील कामगारांना ने-आण करणे अडचणीचे ठरणार आहे. यांसह अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने या उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तरीही महिंद्र अँड महिंद्र कंपनीने बुधवारपासून (दि.२९) कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सुरू होणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. एवढेच काय उत्पादन प्रक्रि या नेमकी कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.
--------
जवळपास सव्वा महिन्यापासून कंपनीतील यंत्रे पूर्णपणे बंद आहेत. उत्पादन सुरू करण्यापूर्वी यंत्रांचे मेंटेनन्स आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादन प्रक्रि या सुरळीत करण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्याचबरोबर वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारा पुरवठा मिळणे गरजेचे आहे. काही मोजक्या कर्मचाºयांना बोलावून यंत्रे स्टार्टअपची कामे करणार आहे. बुधवारपासून नियोजन केले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू करता येईल त्याचे नियोजन करण्यात येत आहे. - प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष, महिंद्र अँड महिंद्र कंपनी, सातपूर

Web Title: Mahindra company to start but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक