विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:01 PM2021-02-12T22:01:47+5:302021-02-13T00:49:10+5:30

सिन्नर : नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी व आरोग्य विभागांचे पदसिद्ध सभापती वगळता उर्वरित सर्व सभापतीपदांच्या जागांवर शिवसेनेकडून महिलांना संधी देण्यात आली.

Mahilaraj as the chairperson of the subject committees | विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलाराज

विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलाराज

Next

सिन्नर : नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी व आरोग्य विभागांचे पदसिद्ध सभापती वगळता उर्वरित सर्व सभापतीपदांच्या जागांवर शिवसेनेकडून महिलांना संधी देण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत नगर परिदषेच्या कार्यालयात विषय समितींच्या सभापतीनिवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती म्हणून किरण डगळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे व वासंती देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आरोग्यरक्षक व वैद्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांची पदसिद्ध सभापती म्हणून नियुक्ती झाली. यावेळी नगरसेवक पंकज मोरे, सोमनाथ पावसे, विजय जाधव, शैलेश नाईक, नलिनी गाडे, मंगला शिंदे, नामदेव लोंढे, रामनाथ लोणारे, रूपेश मुठे, श्रीकांत जाधव, सुजाता तेलंग, गीता वरंदळ, प्रीती वायचळे, सुहास गोजरे, संतोष शिंदे, मल्लू पाबळे, चित्रा लोंढे, अलका बोडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
----------------------------
बिनविरोध निवड झालेले सभापती

पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती- विजया शरद बर्डे (सभापती), सार्वजनिक बांधकाम समिती- प्रणाली उदय गोळेसर (सभापती), नियोजन व विकास समिती- प्रतिभा योगेश नरोडे (सभापती), शिक्षण व सांस्कृतिक समिती- सुजाता अमोल भगत (सभापती), महिला व बालकल्याण समिती- ज्योती वामने (सभापती).

Web Title: Mahilaraj as the chairperson of the subject committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक