शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:42 IST

उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

नाशिक : उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवात विद्युत सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तसेच यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत ‘महावितरण गणपतीच्या दारी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात अधिकृत तात्पुरती वीजजोडणी देण्यात येते. या सर्व गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतल्याची खात्री करणे, न घेतल्यास आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती आदी उद्देशाने विभागात सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.वीज गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहायक अभियंता या पथकांचे नेतृत्व करीत आहेत. आतापर्यंत या उपक्रमात नाशिकरोड, जेलरोड, देवळाली, भगूर, आडगाव, द्वारका आणि उपनगर परिसरातील ८१ गणेश मंडळांना भेटी देऊन वीजजोडणी, वायरिंग आदींची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करून सूचना देण्यात आल्या.सातपूरला राबविली मोहीमनाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनीसुद्धा शहरातील सातपूर, अशोकनगर व आनंदवली येथील गणपती मंडळांना भेटी देऊन यासंदर्भात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नाशिक शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर विभाग २ चे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या गणेश मंडळांच्या दर्शनी भागात ऊर्जा संवर्धन व सुरक्षेबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले. गणेश मंडळ पदाधिकारी व भक्तांकडूनही महावितरणला सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :electricityवीजGaneshotsavगणेशोत्सव