शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जयंती रॅलीत चित्ररथ ठरले लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 16:03 IST

सामाजिक जनजागृती : पथनाट्य, चित्ररथांद्वारे प्रबोधन

ठळक मुद्देसामाजिक जनजागृती : पथनाट्य, चित्ररथांद्वारे प्रबोधन

नाशिक : भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जैन सेवा संघ, विविध जैन संघटना यांच्यावतीने शहरातून गुरुवारी (दि.२९) काढण्यात आलेल्या रॅलीत ‘गोसेवा’, ‘अन्नाची नासाडी थांबवा’, ‘डिजीटल पाठशाळा’ आदि विषयांद्वारे जनजागृती करण्यात आली. पांढरी वस्त्रे परिधान केलेले पुरुष व केशरी साड्या व फेटे परिधान केलेल्या जैन महिलांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. दहीपुलावरील श्री धर्मनाथ देरासर मंदिरापासून शोभायात्रेची सुरवात झाली. ही शोभायात्रा तांबटलेन, भद्रकाली, गाडग ेमहाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, रविवारपेठ, गंगापूर रोडमार्गे काढण्यात आली. चोपडा बॅँक्वेट हॉल येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेच्या माध्यमातुन जैन समाजाने विविध संदेश देत राष्टÑीय एकात्मतेची प्रचिती आणून दिली. अबालवृद्ध, युवक युवती मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.मिरवणुकीच्या अग्रस्थानी सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी चित्ररथांवर ‘स्त्री भृण हत्या थांबवा’, ‘गोसेवा’, ‘अन्नाची नासाडी थांबवा’, ‘हेल्मेटचे महत्व ओळखा’ आदि विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते. शोभायात्रेचे ठिकाठिकाणी स्वागत करण्यात आले. शोभायात्रेचा समारोप चोपडा हाल येथे करण्यात आला. तेथे साध्वी प्रितीसुधाजी, मधुस्मिताजी यांनी भगवान महावीरांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. प्रवचन केले. या प्रवचनातुन समाजबांधवांना भगवान महावीरांचे आचार व विचार आचरणात आणण्याचा हितोपदेश करण्यात आला. त्यानंतर ‘महावीर अस्ताका’चे सामुदायिक पठण करण्यात आले. जैन समाजातील विविध क्षेत्रातील २१ मान्यवरांचा यावेळी नवाकाररत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सचिन गांग यांनी सुत्रसंचालन केले. पवन पाटणी यांनी स्वागत केले. याप्रसंगी जैन सेवा संघाचे ललित मोदी, जयेश शहा,राजेंद्र पहाडे, सुवर्णा काला, विजय लोहाडे, संजय कोचर आदिंसह जैन सोशल ग्रुप, जैन सहेली ग्रुप, प्लॅटिनम ग्रुप, सकल जैन समाज, जिओ लेडिज विंग सदस्या आदिंसह आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८